दिनांक 16 जूलै रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तर दिनांक 18 जूलै रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर 19 जूलै रोजी बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 16 जूलै रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तर दिनांक 18 जूलै रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तर 19 जूलै रोजी बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात औरंगाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात हलका ते मध्यम, जालना जिल्हयात मध्यम तर बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात हलका ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 जूलै ते 27 जूलै, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी. पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.पेरणी केलेल्या बाजरी पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.ऊस पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.हळद पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. हळद पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. डाळींब बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.चिकू बागेत पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. बागेतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
भाजीपाला
पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी. गादीवाफ्यावर लागवड केलेल्या रोपवाटीकेतील रोपांना बुरशी नाशकाची आळवणी करावी.
फुलशेती
पुर्नलागवड केलेल्या फुल पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
चारा पिके
चारा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
तुती रेशीम उद्योग
पावसाळयात ढगाळ वातावरणात संगोपन गृहातील तापमान 22 अं.से. ते 28 अं.से. च्या दरम्यान ठेवावे आणि आर्द्रता 80 ते 85 % ठेवावी. जास्त तापमान व आर्द्रता राहिल्यास रेशीम किटकांवर ग्रासरी रोगाचा प्रादूर्भाव जाणवतो. किटकाचे (अळीचे) शरीर सूजल्यासारखे होते, दुधाळ द्रव बाहेर पडतो. रॅकवर जास्त ओला पाला जास्त प्रमाणात टाकू नये. फांद्या खाद्य आवश्यकतेप्रमाणे दिवसातून तिन वेळा द्यावे. दोन कोषाच्या पिकाच्या दरम्यान आठ दिवसाचा खंड ठेवावा आणि निर्जंतूकीकरण द्रावण 200 मिली प्रति चौरस मीटर याप्रमाणे संगोपन कृहाच्याआत चारही बाजूने व रॅकवर फवारून घ्यावे. अस्त्र 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यासोबत किंवा सॅनिटेक (क्लोरीन डायऑक्साईड) 2.5% किंवा 2 % ब्लीचींग पावडर अधिक चूना द्रावण 0.3% (10 लिटर मध्ये 200 मिली ब्लीचींग पावडर + 30 ग्रॅम चूना द्रावण) प्रमाणे फवारणी करावी.
सामुदायिक विज्ञान
गडद लाल रंगाच्या कांद्याच्या पापुद्रयाचा उपयोग रेशीम आणि सुती कापडे रंगविण्याकरीता : गडद लाल रंगाच्या कांद्याचा वरचा कागद सारखा हलक्या वजनाचा पापुद्रा आपण कचऱ्यात टाकुन देतो, पण लाल कांद्याच्या पापुद्रयात लाल रंगाचे कण असतात. एका स्टीलच्या पातेल्यात एक वाटी पापुद्रयाचा चुरा आणि दहा वाटी पाणी टाकून पातेल्याला मध्यम जाळावर वीस मिनीटे उकळावे, उकळलेल्या पापुद्रयाचे लाल रंगाचे कण पाण्यात विरघळते आणि उकळलेल्या पाण्याचा रंग गडद लाल होतो. लाल रंगाचे द्रावण गाळणीने गाळून घ्यावे. एक मीटर रेशीम व एक मीटर सुती मलमलचे कापड, पातेल्यात घेऊन त्या पातेल्यात गडद लाल रंगाच्या पापुद्रयाचे द्रावण 10 वाट्या टाकून, त्या कापडाला चांगले भिजवून घेणे. कापडाला रंगविण्यासाठी मध्यम जाळावर 20 मिनीट द्रावणात उकळून घ्यावे. सुती मलमलच्या कापडावर हलक्या गूलाबी रंग आणि रेशीम कपड्यावर गडद गुलाबी रंग विकसीत झालेला दिसून येतो. कांद्याचा लाल पापुद्रा हे चांगले नैसर्गीक रंग स्त्रोत आहे, कांद्याचा पाचोळा कचऱ्यात न टाकता जपून ठेवून आपल्या घरातील रूमाल, साडी, ओढण्या, रंगविण्याचा उद्योग सुरु करून आपले उत्पन्न वाढवू शकता
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी