Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सेंद्रिय शेती: काळाची गरज

सद्या कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट पसरलेआहे. कोरोनावर मात करण्यासाठी लाॅकडाउन सारखे उपाय सुरु आहेत. या लाॅकडाउनचा मोठा फटका उद्योगधंद्याना बसला आहे. याचाच परिणाम म्हणून अनेक व्यवसायांवर तसेच हजारोंच्या नोकरीवर झाल्याचं चित्र सर्वत्र पाहता येते.

कोरोनाने सगळीकडे असा हाहाकार माजवला असतानाही अर्थव्यवस्थेला थोडा फार आधार मिळालाय तो म्हणजे कृषीक्षेत्राचा. या कोरोनाच्या संकट काळात अनेक लोकांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवलाय.

आज शेतीत अनेक प्रकार दिसून येत आहेत. कोरडवाहू शेती, बागायती शेती, रासायनिक शेती, सेंद्रिय शेती, त्यातही फळांची, फुलांची आणि पालेभाज्यांची शेती सुरु आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेती करण्याकडे आहे..

 खर्च तुलनेने कमी आहे

त्याला कारण ही तसे अनेक आहेत. त्यातील सर्वात मोठं कारण म्हणजे रासायनिक खतांमुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम. त्यात सेंद्रिय शेतीला येणारा खर्च हा रासायनिक शेतीपेक्षा तुलनेने कमी आहे.

पहिल्या हरितक्रांतीनंतर देशात उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा बेसुमार वापर सुरू झाला. या सारायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीतील कर्ब कमी झाला आहे. बियाने कितीही चांगल्या दर्जाचे असतील तरी त्याच्या उगवण क्षमतेसाठी असणारी जमीनीची सुपीकता, जमीनीचा पोत उत्तम नसेल तर त्याची किंमत शून्य होते.

जमीनीची ही सुपीकता, नैसर्गिक पोत हा टिकून राहतो, वाढतो तो या सेंद्रिय खतांमुळेच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक शेती मध्ये वापरली जाणारी रसायणे ही थेट पिकांच्या शरीरात आणि धान्यांत मिसळली जातात. आपण जेव्हा हीच धान्य खातो तेव्हा ती शोषली गेलेली विषारी अन्नदव्ये धान्याच्या माध्यमांतून आपल्या शरीरात आपल्या पोटात जातात आणि त्याचेच दुष्परिणाम आज आपण सारेच पाहतो आहे.

लोकांचाही कल आता सेंद्रिय शेतीतील उत्पादने विकत घेण्याकडे वाढत आहे. कारण त्यांनाही ही उत्पादने विषमुक्त असल्यामुळे शरीरासाठी आरोग्यदायी असल्याचं लक्षात आले आहे.

जगातील अनेक देशांनी सेंद्रिय शेतीचं महत्व ओळखून त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यात इस्त्राएल, कॅनडा हे देश अग्रेसर आहेत. मात्र जिथे सेंद्रिय शेतीचा उगम झाला आहे असं मानले जाते , त्या भारतातील लोक सेंद्रिय शेतीसाठी उदासिन आहे.

सिक्कीम राज्याने सेंद्रिय शेतीचे महत्व ओळखले

ईशान्यकडील सिक्कीम राज्याने मात्र सेंद्रिय शेतीचे महत्व ओळखले आहे. सिक्कीमने रासायनिक खतावर बंदी घालून आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं आणि आज देशात पहिले सेंद्रिय राज्य म्हणून मान मिळवला आहे. आजमितीस सिक्किममध्ये ७५ हजार  हेक्टरवर सेंद्रिय शेती सुरू आहे.

सिक्किमच्या पाठोपाठ केरळनेही सेंद्रिय शेतीसाठी महत्वाचं पाऊले उचललीआहेत. सेंद्रिय शेतीतज्ज्ञांच्या मतानुसार, सकस आणि जास्त उत्पादन घेण्यासाठी , रासायनिक खतांचे दुष्परिणाम  टाळायचे असेल तर सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही.

सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते, रासायनिक खतांमुळे होणारे संभाव्य धोके टाळता येतात. बाजारात सेंद्रिय शेतीतील उत्पादनाला चांगली मागणी असल्यामुळे किंमतही चांगली  मिळते.

सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना फायदेशीर

शेतीत पाण्याची ५० % बचत होते,  पिकांना जमीनीतील नत्र उपलब्ध होते,जमिनीतील पोषक मुलद्रव्यांची निर्मिती होते, मातीची धूप थांबून पाणी जिरवते, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते, जलधारणाशक्ती वाढते, जमिनीचा सामू नियंत्रित होतो.

फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात, फळे व पिकांची प्रत सुधारते, जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते,जमिनीतील वातावरण खेळते राहते, जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो. या अशा अनेक कारणांमुळे सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते .

निसर्गात नैसर्गिकरित्या सर्व संजीवांसाठी जगण्यासाठी एक साखळी आहे. मात्र मानवाच्या हव्यासापोटी ही नैसर्गिकरित्या जगण्याची साखळी तूटल्या गेली आहे. त्याचेच परिणाम आज आपण सारेच भोगतोय. त्यामुळे पर्यावरणाचे हे बिघडलेले संतुलन साधायचे असेल तर सेंद्रिय शेती शिवाय पर्य़ाय नाही.

सेंद्रिय शेतीसाठी प्रसार आणि प्रचार ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. त्त्यासाठी  प्रबळ राजकीय इच्छाशक्तींची , योग्य समन्वयाची,  योग्य त्या धोरणांची आणि त्यांच्या अंमलबजावणीची…

Exit mobile version