सहकार क्षेत्राला उभारी ची गरज

निफाड तालुक्यातील ३१ संस्थांकडून जिल्हा बँकेच्या कर्जाची १००% कर्जफेड

निफाड वार्तापत्र : दीपक श्रीवास्तव

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सहकारामुळे मोठे परिवर्तन घडले आहे. निफाड तालुक्याचेच उदाहरण घ्यायचे तर तालुक्याची जी खूप वेगवान प्रगती झाली आहे तिच्या मुळाशी सहकारच निर्विवादपणे आहे. 1960 च्या दशकात या तालुक्यात निफाड सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. पाठोपाठ रानवड कारखाना आला. गावागावात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा, इतर सहकारी बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, उपसा जलसिंचन योजना, अशा सहकारी तत्त्वावरील शेकडो संस्था उभ्या राहिल्या. तालुक्यातील अनेक विविध कार्यकारी सोसायट्यांची शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

अनेक संस्था तर आपल्या शताब्दी महोत्सव देखील साजरा करून बसलेल्या आहेत. या संस्थांमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्ज मिळणे सोपे झाले. जुन्या काळातील जुलमी सावकार शाहीला त्यामुळे खूप मोठा पायबंद बसला. गेल्या काही वर्षांपासून मात्र या सहकार विश्वाला मोठीच घरघर लागली आहे. अनेक कारणांमुळे कर्जवसुली न होऊन थकबाकीचे प्रमाण वाढू लागले आहे. कर्ज वसुली न झाल्याने संस्था डबघाईला येऊन संपूर्ण सहकार क्षेत्र उद्ध्वस्त होण्याची भीती दाटू लागली आहे. सहकार क्षेत्र वाचले तरच शेतकरी वाचू शकणार आहे यात शंका नाही. या सर्व भीषण परिस्थितीत निफाड तालुक्यातील 31 सहकारी संस्थांनी जिल्हा बँकेकडून देण्यात आलेल्या वसूल पात्र कर्जाची शंभर टक्के परतफेड करून राज्या समोर व संपूर्ण सहकार क्षेत्रा समोर एक आदर्श घालून दिला आहे.

तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे खूप मोठे आहे. त्यात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या प्राथमिक शेती सहकारी संस्थांची संख्या आता जवळपास १४० झाली आहे . कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या तालुक्यात सन २०१६ पूर्वी असंख्य प्राथमिक शेती सहकारी संस्था नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी वसुलीस पात्र कर्जाची १००% कर्जफेड करत असत.

२०१६ नंतर नैसर्गिक आपत्ती आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला.

कर्जातून बाहेर निघण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर आटापिटा करताना दिसत आहे. अशा परिस्थितीतही आपल्या शेतीच्या उत्पन्नातून कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढली आहे. त्यामुळेच निफाड तालुक्यातील 31 प्राथमिक शेती सहकारी संस्थांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या अल्पमुदत व मध्यम मुदत कर्जापैकी वसुलीस पात्र कर्जाची 100% फेड केली आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये या प्राथमिक शेती सहकारी संस्थांच्या कर्ज वसुलीला शासनाच्या धोरणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे ब्रेक लागला होता. त्यामुळे अनेक शेती सहकारी संस्था तोट्यात गेल्या होत्या तर काही अनिष्ट तफावतीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र यातून मार्ग काढून निफाड तालुक्यातील ३१ प्राथमिक शेती सहकारी संस्थांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी वसुलीस पात्र कर्जाची १००% कर्जफेड केली आहे ही नक्कीच कौतुकाची गोष्ट म्हणता येईल.

या संस्थांच्या कर्तव्यदक्ष सचिवांना निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यात आली आहे.

 

शंभर टक्के कर्जफेड केलेल्या संस्था
कंसात वसुलीस पात्र रक्कम व सचिवांची नावे
१) दावचवाडी ( ३कोटी ५७ लाख ११ हजार )
सचिव- विठ्ठल कोटकर
२) देवपूर (१ कोटी २५ लाख ८२ हजार )
सचिव- विठ्ठल कोटकर
३) शेतकरी पिंपळगाव बसवंत (२ कोटी ५० लाख ७२ हजार )
सचिव -नितीन नरहरी कर्डेल
४ ) कुरुडगाव ( ३५ लाख ९८ हजार )
सचिव- प्रकाश साटोटे
५) रसलपुर ( ३५ लाख ३० हजार ) सचिव- शिवाजी तुगावे
६) काथरगाव ( १ कोटी २७ लाख ८१ हजार )
सचिव – ज्ञानेश्वर मोगल
७) सुंदरपुर ( ६७ लाख ६२ हजार )
सचिव राजेभोसले
८ ) शिवरे ( ३ कोटी६ लाख २६ हजार )
सचिव- संदिप सानप
९ )समर्थ- शिवरे ( ८६ लाख ६६ हजार )
सचिव-सुनिल गोसावी
१०) सावरगाव ( १ कोटी ७२ लाख ६९ हजार )
सचिव शिवाजी तुगावे
११) नांदूर खुर्द (३५ लाख ४२ हजार )
सचिव – शिवाजी तुगावे
१२) पिंपळगाव नजीक (९० लाख ३५ हजार )
सचिव -संतोष गांगुर्डे
१३ ) कोटमगाव (१ कोटी ३२ लाख २९ हजार )
सचिव- संजय भंडारे
१४ ) लासलगाव ( १ कोटी९१ लाख ६९ हजार ) सचिव-नरहरी गंभिरे
१५ ) देवगाव ( ६६लाख ८४ हजार ) सचिव -रावसाहेब पगारे १६ ) शेतकरी- वाकद(३७ लाख ८४ हजार )
सचिव -पांडुरंग बडवर
१७ ) वाहेगाव ( ८ कोटी ५८ लाख ५८ हजार )
सचिव -शिवाजी तुगावे
१८ ) ब्राह्मणवाडे (४० लाख ९६ हजार )
सचिव -सचिन जगताप
१९ )अंतरवेली ( २ कोटी ९३ लाख ११ हजार )
सचिव – वनाथ वाटपाडे
२०) गोरठाण ( ८० लाख ९० हजार )
सचिव -गणेश शिंदे
२१) शिंपी टाकळी (६८ लाख ६४ हजार )
सचिव – संतोष गामने
२२) चाटोरी ( ९५ लाख ४९ हजार)
सचिव -संतोष
२३ ) शिंगवे (१ कोटी ५० लाख ८० हजार )
सचिव – विठ्ठल लोखंडे
२४) तळवाडे ( ७९ लाख ७६ हजार )
सचिव – विठ्ठल लोखंडे
२५) चापडगाव ( ३४ लाख ५० हजार )
सचिव- प्रकाश साटोटे
२६) श्रीराम सायखेडा ( २ लाख ५० हजार )
सचिव – ज्ञानेश्वर कदम
२७ )तारुखेडले (८५ लाख ) सचिव – ज्ञानेश्वर कदम
२८) तामसवाडी ( ४२ लाख ८३ हजार )
सचिव -ज्ञानेश्वर कदम
२९ ) लालपाडी (९३ लाख ६३ हजार )
सचिव -अशोक डावखर
३०) भुसे (१ कोटी ३० लाख २१ हजार) द
सचिव समाधान कमानकर
३१) रेडगाव (१९ लाख ९० हजार )
सचिव -गणेश शिंदे