टाटा कन्सल्टन्सी सर्विससेस या देशातील आघाडीची IT कंपनी मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आली आहे. कंपनीने नवीन पदवीधरांसाठी नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. सन 2020 किंवा 2021 मध्ये BTech, MTech, BE, ME, MCA किंवा MSc परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी TCS ऑफ-कॅम्पस भरती करत आहे.
ही भरती माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रिया सेवांसाठी केली जाईल. टाटा कन्सल्टन्सीमध्ये संधी शोधणारे तरुण www.tcs.com वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा.
शैक्षणिक पात्रता अशी असावी :
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्यांकडे एकूण 60% किंवा त्याहून अधिक गुण असणे आवश्यक आहे. दहावी, बारावी आणि पदवीमध्ये मिळालेले गुण जोडून गुणांची गणना केली जाईल. 2020 किंवा 2021 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीच या पदांसाठी अर्ज करावा. 2020 किंवा 2021 पूर्वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या पदांसाठी पात्र मानले जाणार नाहीत. BE, BTech, ME, M Tech, MCA आणि MSc असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा :
उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या दोन फेऱ्यांतून जावे लागेल. पहिल्या फेरीत लेखी परीक्षा आणि दुसऱ्या फेरीत मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना दुसऱ्या फेरीसाठी निवडले जाईल. कंपनीने लेखी परीक्षेची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
अर्ज कसा करावा?
सर्व प्रथम, TCS च्या वेबसाइटवर जा. IT श्रेणी अंतर्गत नोंदणी करा आणि संबंधित माहिती भरा. शेवटी, अर्ज भरल्यानंतर, तो तपासून खात्री करा.