Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

जागल्या : जलयुक्त शिवार अभियान – `कॅग’ च्या अहवालातील तपशील

प्रास्ताविक:

जलयुक्त शिवार अभियाना संदर्भात `कॅग’ने ओढलेल्या ताशे-यांवर सध्या चर्चा चालू आहे. त्या अहवालातील अद्याप समाजासमोर न आलेला तपशील या लेखात दिला आहे. नियोजनात  चूका आणि अंमलबजावणीत त्रुटी,  देखभाल-दुरूस्तीकरिता निधीच नसल्यामूळे निर्माण झालेल्या मत्तेचा बट्याबोळ; विंधन विहिरी, भूजल-उपसा, जास्त पाणी लागणा-या पिकांचे क्षेत्र,  टॅंकर्सची संख्या इत्यादीत नेहेमीप्रमाणे  वाढ;  भूजल पातळीत  घट; संनियंत्रण आणि मूल्यमापनातील  लक्षणीय अपूर्णता, जलयुक्ततेबाबतचे फसवे दावे अशा अनेक  बाबी `कॅग’च्या अहवालातून पुढे येतात. `सैतान तपशील असतो’ ही उक्त्ती किती सार्थ आहे याची जाणीव करून देणारा हा तपशील – `कॅग’च्या सौजन्याने!

`कॅग’ची कार्यपद्धती:

जलयुक्त शिवार अभियानात (लेखात यापुढे फक्त जलयुक्त असा उल्लेख ) एकूण २२५८६  गावे आणि ६.४१  लाख कामांचा समावेश होता. त्यावर रू ९६३३.७५  कोटी एवढा एकूण खर्च झाला.  जलयुक्तचे  मूल्यमापन करण्याकरिता `कॅग’ने अहमदनगर, बीड, बुलढाणा, पालघर, नागपूर आणि सोलापूर हे सहा जिल्हे निवडले. त्या सहा जिल्ह्यातील एकूण ८५४०  गावांपैकी ५१९४  गावांमध्ये रू २६१७.३८  कोटी खर्च करून जलयुक्तची एकूण १.७४  लाख कामे करण्य़ात आली. उपरोक्त सहा जिल्ह्यांमधुन “जलयुक्त वर सर्वात जास्त खर्च झालेले प्रत्येकी दोन तालुके” या निकषानुसार एकूण बारा तालुके निवडण्यात आले.  प्रत्येक तालुक्यातून  दहा गावे या प्रमाणे  एकशे वीस  गावे  आणि त्या गावातील एकूण ११२८  कामे “रॅंडम” पद्धतीने  निवडण्यात आली.संबंधित अधिका-यांबरोबर  त्या कामांना प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या आणि कागदपत्रांची छाननीही करण्यात आली. मूल्यमापना दरम्यान `कॅग’ने पुढील शासकीय विभागांकडील जलयुक्त संदर्भातील दस्तावेजांचे परीक्षणही केले –  (१)जलसंधारण विभाग (मे २०१७  मध्ये या विभागाचे नामांतर मृद व जलसंधारण विभाग असे झाले),  (२) कृषी आयुक्तालय आणि (३)भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जी एस डी ए). लेखाच्या उर्वरित भागात `कॅग’च्या अहवालातील निष्कर्ष संक्षिप्त स्वरूपात दिले आहेत.

नियोजनात चूका:

एकूण १२०  गावनिहाय आराखड्यांपैकी  ७६  (६३%)  आराखड्यात गावातील उपलब्ध पाण्याच्या तुलनेत कमी  साठवण क्षमतेच्या कामांचे नियोजन करण्यात आले. एकूण नियोजित साठवण क्षमता ही अंदाजित अपधावेपेक्षा १.६४  लाख सहस्र घनमीटरने कमी होती. या ७६ गावांपैकी १०  गावात (१३ %) गावात  अपधाव परिगणीत करताना झालेल्या चुकांमूळे नियोजित अपधाव प्रत्यक्ष अपधावेपेक्षा कमी होता.

प्रत्यक्ष साठवण क्षमता नियोजना पेक्षा कमी

एकूण  १२०  गावांपैकी ८३  (६९ %) गावांमध्ये  प्रत्यक्ष निर्मित साठवण क्षमता ही नियोजित साठवण क्षमतेपेक्षा  कमी होती. या ८३  गावांपैकी १७  (२०.५ %) गावात टॅंकर लावावे लागले.

नियोजन आणि अंमलबजावणीतील त्रुटींबाबत ना खूलासा करण्यात आला ना  स्पष्टीकरण मागण्यात आले.

देखभाल-दुरूस्ती-निधी अभावी कामांच्या आयुष्यात घट

जलयुक्तच्या कामांची देखभाल-दुरूस्ती करण्याकरिता ग्रामसभा निश्चित करेल त्या निकषांआधारे  लोक-वाटयातून काही रक्कम उभी रहावी, ग्रामसभेने उभ्या केलेल्या रकमेत (रू. दोन लक्ष प्रति वर्ष या मर्यादेत)  शासन तेवढीच भर घालेल अशी व्यवस्था  अभिप्रेत होती. प्रत्यक्षात १२०  पैकी एकाही ग्रामसभेने अशी रक्कम उभी केली नाही. लोक-वाटयाच्या अभावी शासनानेही आपला वाटा दिला नाही. परिणामी, जलयुक्तच्या कामांची देखभाल-दुरूस्तीकरण्याकरिता निधीच उपलब्ध झाला नाही.  देखभाल-दुरूस्तीच्या अभावामूळे जलयुक्तच्या कामांची काय दशा झाली याची उदाहरणे कॅगच्या अहवालात  देण्यात आली आहेत. देखभाल-दुरूस्तीविना  जलयुक्तच्या कामांचे आयुष्य कमी होणार हे उघडच आहे.

नियमांअभावी भूजल कायद्याची अंमलबजावणी नाही

भूजल कायद्याची अंमलबजावणी करणे हे जलयुक्त चे एक महत्वाचे उद्दिष्ट होते. पण महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ चे  नियम अद्याप झालेले नसल्यामूळे त्या बाबतीत काहीच झाले नाही. त्यामूळे मागणी-व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खालील  विपरित बाबी घडल्या

जलपरिपूर्णता अहवाल: गोडी अपूर्णतेची

प्रत्येक गावात पाण्याची मागणी व पुरवठा यांची सांगड कशी व कितपत घातली गेली याचा तपशील जलपरिपूर्णता अहवालात देणे अपेक्षित आहे. काय म्हणतात हे अहवाल?

टॅंकर्स आपले चालूच   

मूल्यमापनासाठी निवडलेल्या सहा जिल्ह्यात २०१७  साली ३३६८  टॅंकर्स लावावे लागले होते. दोन हजार एकोणीस साली टॅंकर्सची संख्या तब्बल ६७९४८ (वीस पट) झाली.

भूजल पातळीत घट

जलयुक्तच्या अगोदरची आणि नंतरची भूजल पातळी यांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी `कॅग’ने ५८ गावे निवडली. कारण  `जीएसडीए’ कडॆ त्या प्रकारची  माहिती तेवढयाच गावांसंदर्भात  उपलब्ध होती.  जलयुक्त झाल्यानंतर ज्या वर्षी जलयुक्त होण्य़ापूर्वीच्या वर्षापेक्षा पाऊस जास्त होता असे वर्ष `कॅग’ ने भूजल पातळीचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी निवडले.त्या वर्षानंतर येणा-या पहिल्या मे महिन्यातील भूजल पातळीत वाढ झाली का घट हे तपासण्यात आले. एकूण ५८  गावांपैकी ३५ (६०%) गावात भूजल पातळी घटली तर २२ (३८%) गावात ती वाढली.एका गावात  काही बदल झाला नाही.ज्या बावीस गावात भूजल पातळीत वाढ झाली त्या पैकी चार गावात १८ ते ४९ % एवढी पावसात वाढ होऊनही भूजल पातळीत मात्र ४  ते १५  टक्केच वाढ झाली.

त्रयस्थ संस्थांकडून केलेले मूल्यमापन अपूरे

मूल्यमापनासाठी निवडलेल्या सहा जिल्ह्यात २०१५ ते २०१९  या कालावधीत १.७४  लाख कामे पूर्ण झाली. पण त्यापैकी फक्त ३७००१ (२१%)कामांचे त्रयस्थ संस्थांकडून मूल्यमापन झाले. २०१७-१८  साली बुलढाणा जिल्हा वगळता २५१९९  कामे तर २०१८-१९  साली सर्व सहा जिल्ह्यात १६६८८  कामे पूर्ण झाली पण त्यांचे त्रयस्थ संस्थांकडून मूल्यमापन झाले नाही.

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यातील कामांचे  त्रयस्थ संस्थेकडून  मूल्यमापन करून घेण्यात आले. त्या अहवालानुसार मोखाडा  व जव्हार तालुक्यातील खालील कामांच्या बांधकामांची गुणवत्ता चांगली नव्हती.

मोखाडा तालुका:

जव्हार तालुका:

१३  नाला सिमेंट बांधांपैकी ७ (५४%)

संनियंत्रण:

एकूण १.७७  लाख कामांपैकी १.०१ लाख (५७%) कामांचे जीआयएस आधारित फोटो संकेतस्थळावर टाकण्यात आले

निष्कर्ष

शिफारशी

शासनाने खालील बाबींची सुनिश्चिती करावी

Exit mobile version