दोन वर्षे कालावधीचा एम.ए इन पब्लिक ॲण्ड गव्हर्नन्स, हा अभ्यासक्रम अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीने सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विषयातील पदवीधराला प्रवेश मिळू शकतो.
या अभ्यासक्रमामध्ये विकसनशील घटनात्मक लोकशाहीमध्ये सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या सैध्दांतिक बाबी शिकवल्या जातात. या समस्या सोडवण्यासाठीचे आराखडे तयार करताना मानवीय मूल्ये आणि सर्वसमावेशकता यांचा काटेकोर वापर कसा करता येईल, याविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान प्रज्ञान केले जाते.
विद्यार्थ्यांना भारतीय मानसिकतेविषयी सखोल ज्ञान :
या अभ्यासक्रमामध्ये विधि, अर्थशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, राजकारण आणि मानववंशशास्त्र या आंतरज्ञाशाखातील विषय घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय मानसिकतेविषयी सखोल ज्ञान मिळून, सामाजिक समस्या सोडवताना वा त्यासाठी कृतीआराखडा तयार करताना याचा उपयोग होतो.
अभ्यासक्रमात पुढील विषयांचा समावेश –
राज्ये आणि भारतातील सुशासन, भारतातील राज्यांचा घटनात्मक पाया, राज्य -मंडई/बाजार- अर्थशास्त्र, भारतातील सार्वजनिक धोरणे, धोरण विश्लेषण, कार्यक्रमांचे मूल्यमापन, माहितीचा साठा – संशोधनाचा आराखडा – वर्णनात्मक पध्दती, भारतातील राजकारण आणि लोकशाही, सार्वजनिक क्षेत्रातील मूल्ये आणि नैतिकता, कार्यकारणभाव असलेल्या आणि अनपेक्षित कार्यपध्दती.
करिअर संधी –
हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय संस्था, शासनाच्या अंतर्गत कार्यरत संस्था, शासनासोबत सहकार्याने कार्यरत संस्था, नागरी हितासाठी कार्यरत संस्था, अशासकीय संस्था, मूल्यमापन, संनियंत्रण आणि कार्यक्रम कार्यान्वयानाच्या विविध पैलूंवर कार्यरत असणारे सामाजिक उद्योजकीय घटक, संशोधन आणि सल्ला देणाऱ्या संस्था, यांचा समावेश आहे.
या संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेत 300च्या आसपास वर नमूद संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांनी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विविध भूमिका आणि पदांसाठी करिअर संधी दिली आहे.
संपर्क –
अझिम प्रेमजी युनिव्हर्सिटी, ॲडमिशन ऑफिस, पीइएस कॅम्पस, पिक्सेल पार्क, बी ब्लॉक, इलेक्ट्रॉनिक्स सिटी, हौसर रोड, बेंगळुरु – 560100, ईमेल- reachus@apu.edu.in, संकेतस्थळ- apu.edu.in