Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सांख्यिकीशास्त्रातील करिअर

सांख्यिकीशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) हे उपलब्ध माहितीवरुन निष्कर्ष काढणारं शास्त्र आहे. यामध्ये शास्त्रोक्तरीत्या माहिती गोळा करणं, अर्थ लावणं, वस्तुनिष्ठ पध्दतीनं ही माहिती सादर करणं या बाबिंचा यात समावेश होतो. सध्या वेगवेगळया कंपन्या, संस्था, कार्पोरेट हाऊसेस आणि उद्योगांकडे विविध प्रकारच्या माहितीचा प्रचंड साठा गोळा होत आहे. समाजमाध्यमांचा वापर करुन फेसबुक, गुगल, व्हॉटस ॲप या कंपन्या आपली व्यक्तिगत माहिती गोळा करताहेत. यासर्व माहितीच्या साठयाचा उपयोग त्याच्या विश्लेषणानंतरच होऊ शकतो. असं विश्लेषण करण्याचं कौशल्य सांख्यिकी तज्ज्ञांना प्राप्त करता येते.

आवश्यक असणारी कौशल्ये-
१) माहिती तत्रंज्ञान कौशल्य, विश्लेषण कौशल्य आणि आकडेमाडीचं कौशल्य हस्तगत केलेलं असावं. २) त्यांना विविध प्रवाहांचं आकलन होणं आवश्यक आहे. २) किचकट किंवा व्यामिश्र माहितीचा अभ्यास करण्यासाठी सुयोग्य कार्यप्रणाली वापरता यायला हवी. ३) समस्या निर्धारण व नाविण्यपूर्णरीत्या विचार करण्याचं कौशल्य. ४) प्रश्नांची नेमकी जाण समजून घेण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींची सुसंवाद साधण्याचे कौशल्य हवे.

करिअर संधी-
सांख्यिकी शास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना पुढील पदांवर काम करण्यासची संधी मिळू शकते- १) इकॉनॉमेट्रिशिअन, २) स्टॅटिशिअन, ३)रिसर्च ॲनलिस्ट, ३)बायोस्टॅटिस्टिअन, ४)बायोमेट्रिशिअन्स, ५)इपिडेमिनॉलॉजिस्ट, ६)डाटा सायंटिस्ट, ७)स्पोर्ट्स स्टॅटिस्टिशिअन ,८)मेडिकल स्टॅटिस्टिशिअन, ९)अनेक खाजगी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये लोकसंख्या व इतर अशाच प्रकारच्या माहितीचे विश्लेषण करणे ,निष्कर्ष काढणे यासाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज भासते. १०) राष्ट्रीय सुरक्षा संस्था, शस्त्रास्त्रांचे सांख्यिकीय विश्लेषण आणि त्याअनुंषगाने व्युहनीतीच्या निर्धारणासाठी अशा तज्ज्ञांची मदत घेतात. ११) संघ लोकसेवा आयोग, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस या परीक्षेद्वारे अशा मनुष्यबळाची वरिष्ठ पदांसाठी नियुक्ती करते.१२)स्टॉफ सिलेक्शन कमिशनद्वारे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर अशा कनिष्ठ पदावर नियुक्ती देत असते.१३) खाजगी क्षेत्रात विमा, माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर, गुणवत्ता नियंत्रण, या विषयांसाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज भासते. १४) वित्तीय कंपन्या आणि समभाग विक्री कंपन्यांमध्ये संधी मिळते. १५)अक्चुरिअल सांयन्स या विषयात पुढील शिक्षण घेऊन विमा क्षेत्रा चांगले करिअर करता येते.

पदवीस्तरीय अभ्यासक्रम
स्टॅटिस्टिक्स (सांख्यिकी) या विषयात १२ वी नंतर पदवीस्तरीय अभ्यासक्रम करता येतो. बहुतेक सर्व विद्यापीठांमध्ये असा अभ्सासक्रम चालवला जातो. या विषयातील शिक्षण देणारी महत्वाची व दर्जेदार संस्था म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्यूट होय. या संस्थेत बीएस्सी इन स्टॅटिस्टिक्स आणि बीएस्सी इन मॅथेमॅटिक्स हे प्रत्येकी तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशस्तरीय चाळणीपरीक्षा घेतली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा तीन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. संकेतस्थळ- www.isical.ac.in

Exit mobile version