करियर : हवाई सुंदरी

आकर्षक, सुंदर व्यक्तिमत्व असल्यास हवाई सुंदरी (एअर होस्टेस) म्हणून नवे करिअर तरुणींसाठी उपलब्ध आहे. आजकाल अनेक तरुणी प्रशिक्षण घेऊन नामवंत विमान कंपन्यांत कार्यरत आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांची काळजी घेणे आणि त्यांचा प्रवास सुंदर करणे ही प्रामुख्याने जबाबदारी हवाई सुंदरीची असते.

आदरातिथ्य आणि चेहऱ्यावर स्मितहास्य असेल तर हवाई सुंदरी म्हणून करिअर करण्यास आपण योग्य आहात. चला तर मग या क्षेत्रातील संधींविषयी जाणून घेऊया:

हवाई सुंदरी होण्यासाठी पात्रता :
• बारावी पास असणे अनिवार्य
• प्रभावी आकर्षक व्यक्तिमत्व
• दोनपेक्षा अधिक भाषांचे ज्ञान
• इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तसेच शब्दोच्चार स्पष्ट आणि शुद्ध हवेत.
• उत्तमसंवाद कौशल्य (कम्युनिकेशन स्किल)
• शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे
• हजरजबाबी, सकारात्मक विचार, विनम्रता हे गुण आवश्यक
• कमीत कमी उंची १५७.५ सेमी हवी आणि डोळ्याची दृष्टी ६/६ हवी
• वय १८ ते २५ दरम्यान असावे
• प्रतिकूल प्रसंगातही शांत राहून धैर्याने परिस्थिती हाताळावी लागते. अनेकदा प्रवाशांनी वारंवार प्रश्न विचारल्यास न चिडता न रागवता त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात.

उपलब्ध अभ्यासक्रम असे आहेत :
• बॅचलर ऑफ सायन्स एअरहोस्टेस ट्रेनिंग
• बीबीए इन एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट
• डिप्लोमा इन एव्हिएशन आणि हॉस्पीटॅलिटी
• डिप्लोमा इन एव्हिएशन आणि केबिन क्रु
• डिप्लोमा इन पर्सनॅलिटी डेलपमेंट, कम्युनिकेशन स्किल्स आणि एअरलाइन्स टिकेटिंग
• इंटरनॅशनल एअरलाईन्स आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट मधील सर्टिफिकेट कोर्स
• एअर होस्टेस / फ्लाइट कोर्स मधील सर्टिफिकेट कोर्स

परीक्षा आणि मुलाखतीची तयारी अशी करा :
• मित्राच्यांत समूह चर्चा करावी. काही धीरगंभीर प्रसंग उभा करून तो कसा हाताळायचा याचा सराव करावा
• अशा काही प्रशिक्षण संस्था आहेत ज्या अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी सहाय्य करतात अशाच संस्थेत प्राधान्याने प्रवेश घ्यावा.
• काही एअरलाईन्स कंपनी नोकरीपूर्व लिखित परीक्षा घेतात ज्यात उमेदवाराची अभियोग्यता चाचणी (अॅप्टीट्युड टेस्ट) घेतली जाते.
• तसेच कौशल्य चाचणी (स्किल टेस्ट) घेतली जाते ज्यात कौशल्यावर अधिक प्रश्न विचारले जातात.
• परीक्षेसाठी जाताना विषयाचा सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे.

अशी मिळेल संधी :
अन्य क्षेत्रासारख्या यातही पुढे जाण्याचा अमाप संधी तरुणाईला उपलब्ध आहेत. सीनियर एअर होस्टेस पदापर्यंत पोहोचल्यानंतर सीनियर फ्लाईट अटेंडंट म्हणूनही संधी मिळते. हवाई सुंदरीचा कार्यकाल जास्तीतजास्त ८ ते १० वर्षाचा असतो. त्यानंतर ग्राउंड ड्युटी किंवा व्यवस्थापनाची कामे दिली जातात.

वेतनमान :
सुरुवातीच्या काळात वार्षिक वेतन २ ते ४ लाखापर्यंत असते. अनुभव वाढल्यानंतर त्यात वाढ होते. सध्या आकर्षक पॅकेजही दिली जातात.

प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची माहिती :

• फ्रांकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग
सी १२, विशाल एनक्लेव द्वितीय मजला, राजौरी गार्डन, नवी दिल्ली.

• फ्रांकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग
बेस्ट बिल्डींग, ‘ए’ विंग, ५ वा मजला, एस. रोड, अंधेरी रेल्वे स्टेशन समोर, अंधेरी (प), मुंबई – ४०००५८

• फ्रांकफिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग
कनॉट प्लेस, तिसरा मजला, सीटीएस नं .२८, बंड गार्डन रोड, पुणे, महाराष्ट्र ४११००१

• विंग्स एअर होस्टेस अँड हॉस्पीटलॅलिटी ट्रेनिंग
१ ला मजला रामकृष्ण चेंबर्स, नेपच्यून टॉवर्स जवळ, बीपीसी रोड, अल्कापुरी, वडोदरा गुजरात.

• इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ एअरनोटीक्स
– पंचवटी सर्कल, राजापार्क, जयपूर राजस्थान,
– एससीओ ११२-११३ चौथा मजला चंदीगड,
– ३०१, शिरीरत्न, पंचवटी सर्कल, अहमदाबाद गुजरात.
– नेहरु नगर, राकेश मार्ग, गाझियाबाद.

• राजीव गांधी मेमोरियल कॉलेज ऑफ एरोनॉटिक्स किंवा आर.जी.एम.सी.सी. समोर सांगणेर विमानतळ, जयपूर – ३०२०११, राजस्थान.

• एव्हलॉन अकादमी युनिट क्रमांक २०१/२०२,
कोहली व्हिला एस.व्ही. शॉपर्स नजदीक रोड ‘स्टॉप अंधेरी (प) पिन – ४०००५८

• स्टाफ कॉलेज, सांताक्रूझ पूर्व, कलिना,
एअर इंडिया कॉलनीजवळ, जुने विमानतळ जवळ, मुंबई – ४०००९८

• किंगफिशर ट्रेनिंग अॅण्ड एविएशन सर्विसेस लिमिटेड (केटीए)
टाइम स्क्वेअर, साई सर्व्हिस,वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९

• ट्रेड-विंग्स इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (टीआयएम), मुंबई

– ट्रेड-विंग्ज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट १८/२०, के. दुभाष मार्ग काळा घोडा, फोर्ट, मुंबई.
• बॉम्बे फ्लाइंग क्लब जुहू एरोड्रोम, जुहू तारा रोड, मुंबई, ४०००९४