सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या(MOSPI), राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO)जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत संयोजित केलेल्या भारतातील सामाजिक आरोग्य विषयक गरजांच्या 75 व्या फेरीतील प्रमुख संकेतकांनुसार असे लक्षात आले आहे की, अखिल भारतीय पातळीवर 95.4% आजारांत अँलोपथीचा(पाश्चात्त्य वैद्यकीय पध्दती)वापर केला जातो तर 4.4% आजारांवर आयुष पध्दतीने( AYUSH),आयुर्वेद,नॅचरोपॅथी, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी )उपचार केले जातात.
ग्रामीण आणि शहरी भागातील आकडेवारी खालील प्रमाणे:
Sector | Percentage of ailments treated by | ||
Allopathy | AYUSH | ||
Rural | 95.4 | 4.5 | |
Urban | 95.4 | 4.3 | |
All | 95.4 | 4.4 |
स्रोत: भारतातील सामाजिक उपभोक्ता प्रमुख संकेतांक आरोग्य 75वी फेरी (NSS KI-75/25.0, www.mospi.gov.in)
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय(NSO) आयुषचे (AYUSH)विशिष्ट सर्वेक्षण करत नसून वेळोवेळी आरोग्य आणि मृत्यू विषयक सर्वेक्षण करते.शिवाय आयुष यंत्रणेचे विभाजन झाले असून हे सर्वेक्षण संपूर्णपणे आयुषच्या सर्व सुविधांचे एकत्रितपणे यात समाविष्ट करू शकत नाही.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या संयोजित केलेल्या 75 व्या भारतातील सामाजिक आरोग्य विषयक गरजांच्या फेरीत असेही लक्षात आले आहे की शहरी भागातील पुरुष ग्रामीण भागातील पुरुषांपेक्षा आयुष उपचारांचा वापर अधिक करतात तसेच ग्रामीण भागातील स्त्रियांपेक्षा पेक्षा आयुष उपचारांचा वापर शहरी भागातील स्त्रिया अधिक करतात.
ercentage of ailments treated by AYUSH | |||
Male | Female | ||
Rural | 4.2 | 4.7 | |
Urban | 3.6 | 5.1 | |
All | 4.1 | 4.8 |
स्रोत: भारतातील सामाजिक उपभोक्ता प्रमुख संकेतांक आरोग्य 75वी फेरी (NSS KI-75/25.0, www.mospi.gov.in)
तथापि भारत सरकार केंद्रीय पुरस्कृत नॅशनल आयुष मिशन (NAM,नाम) ही योजना विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशात राबवित आहे.त्यात खालील बाबींचा समावेश आहे :
- विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशात एकात्मिक पध्दतीने आयुष रुग्णालये सुरू करण्यासाठी सहाय्य करून आयुष सेवा अधिक सक्षमतेने प्रदान करणे, आयुष रुग्णालये आणि दवाखाने यांचे नूतनीकरण, आयुष औषधांचा पुरवठा करणे
- विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आयुष शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत आणि शैक्षणिक सुविधांचे सबलीकरण करणे
- आयुष औषध कंपन्या आणि औषध चाचणी प्रयोगशाळा स्थापन करून आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी(आयुष AUS&H)यामधे दर्जा आणि गुणवत्ता नियंत्रण यांची अंमलबजावणी करणे.
- आयुर्वेदिक, युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी (ASU&H)यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा शाश्वतपणे उपलब्ध व्हावा यासाठी औषधी वनस्पतींच्या लागवडीस प्रोत्साहन देणे.
याखेरीज या मंत्रालयाने विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 2014 ला नामच्या(NAM) स्थापनेपासून नामच्या विविध उपक्रमांसाठी आतापर्यंत राज्ये/केंद्र शासित प्रदेशांना 2583.666कोटी रुपयांचे अनुदान सहाय्य दिले आहे.
ही माहिती आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. किरेन रिजिजू ( आयुर्वेद,नॅचरोपॅथी युनानी, सिध्द आणि होमिओपॅथी उपचार मंत्रालय,अतिरिक्त प्रभार) यांनी लिखित उत्तरात दिली.