मराठवाड्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणेश स्थाने

औरंगाबादजवळील वेरूळचा लक्षविनायक

औरंगाबादपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावी गणेशाचे हे स्थान आहे। गणेशाच्या एकवीस स्थानांपैकी एक स्थान समजले जाते। शिवपुत्र स्कंदाने या गणेशाची स्थापना केल्याचा पुराणात उल्लेख सापडतो.
राजूर गणेश

गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी पूर्णपीठ असलेले जालना जिल्ह्यातील राजूर, ता. भोकरदन येथील वरेण्यपुत्र गणपती क्षेत्र.

 

सेंदूरवाड्याचा सिंदुरान्तक गणेश
औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्‍यातील सेंदूरवाडा येथे या गणेशाचे स्थान आहे. खाम नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. खाम नदीत हेमाडपंती बांधणीचे श्रीगणेशाचे मंदिर आहे. हे एक अत्यंत जागृत स्थान समजले जाते. याच ठिकाणी श्रीगणेशाने सिंदूरासुराशी युद्ध केले. त्यावरून या गणेशाला सिंदुरान्तक गणेश हे नाव पडले.
येथील गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या पाठीमागे डाव्या बाजूला त्याच दगडात म्हसोबाची मूर्ती कोरलेली आढळते. याठिकाणी उंदीर हे गणपतीचे वाहन नाही. उंदीर आणि गणपतीचे याच ठिकाणी युद्ध झाले होते अशीही एक आख्यायिका येथे प्रसिद्‌ध आहे.

मराठवाड्यातील अन्य गणेशस्थाने पुढीलप्रमाणे –

अजिंठ्याची गणेशलेणी; सातारा येथील द्वादशहस्त गणेश; औरंगाबाद शहरातील समर्थ नगर येथील श्री वरद गणेश मंदिर; मराठवाड्यातील स्वयंभू सिद्‌धस्थान नांदेड येथील त्रिकुट गणेश; नांदेड शहरातील जोशीगल्लीतील श्रीगजानन; नांदेड शहरातील नवसाला पावणारा आखाड्याचा गणपती; कंधार, जि. नांदेड येथील साधुमहाराजांचा गणपती; दाभाड,ता.नांदेड येथील श्री सत्य गणपती मंदिर; नवगण राजुरी, जि. बीड येथील नवगणपती; अंबाजोगाई, जि. बीड येथील पाराचा गणपती; बीड जिल्ह्यातील नामलगांव गणेश; राक्षसभुवन, जि. बीड येथील विज्ञानगणेश क्षेत्र; गंगामसले, जि. बीड येथील भालचंद्र गणेश.