कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत। इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईंनी समारंभपूर्वक कसबा गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली व दगडी गाभारा बांधून दिला. श्री शिवाजी महाराजांच्या वाड्याला लागूनच हे स्थान असल्याने शिवाजी महाराज व त्यांच्या घराण्यातील मंडळी वारंवार या गणपतीच्या दर्शनास जात असत. प्रथम ही मूर्ती तांब्याच्या आकाराची होती परंतु वारंवार शेंदूर लावीत असल्यामुळे तिची उंची आता सुमारे तीन फूट आणि रुंदी पाच फूट झाली आहे. पुण्यात शनिवारवाड्याच्या बाजूलाच कसबा गणपतीचे स्थान आहे.
सारसबाग – श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना थेऊरच्या गणेशाद्वारे झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी उजव्या सोंडेच्या मूर्ती थेऊरची प्रतिकृती म्हणून इ।स। १७७४ मध्ये सारसबागेच्या तळ्यात स्थापन केली. त्यामुळे हा गणपती पुढे कितीतरी दिवस तळ्यातील गणपती म्हणून ओळखला जात असे. आता सारसबाग तळ्यातील सिद्धिविनायक म्हणून तो ओळखला जातो.
पेशवेकालीन मूर्ती खराब झाल्यामुळे एकदा १८८२ आणि एकदा १९९० अशी दोनदा बदलण्यात आली. पर्वतीच्या पायथ्याशी, स्वारगेट जवळ हे स्थान आहे.दशभुज चिंतामणी – पुण्याला पर्वतीच्या पायथ्याजवळ लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये श्रीगणेशाचे हे स्थान आहे. दशभुजा असलेली ही मूर्ती अति प्राचीन आहे. श्री दामोदर खळदकर यांना झालेल्या दृष्टांतानुसार खोदाईकाम करताना ९ ऑक्टोबर १९६४ रोजी ही मूर्ती आढळली. हे अत्यंत जागृत ठिकाण असून अनेक श्रीभक्तांना तसे अनुभव आले आहेत.
याशिवाय पुणे शहरात श्रीगणेशाची अनेक स्थाने आहेत। त्यांची माहिती पुढीलप्रमाणे -शनिवार पेठेतील वरद-गुपचूप गणपती, सहकारनगर, पर्वती जवळील दशभुज चिंतामणी, सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती, गणेशखिंडीतील श्री पार्वतीनंदन, कर्वे रोडवरील दशभुज चिंतामणी, पर्वतीजवळ थोरले नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेला सदरेतला गणपती, नारायण पेठेतील मोदी सिद्धिविनायक गणपती।
चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरचिंचवड स्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोरया गोसावी मंगलमूर्तीचे मंदिर आहे। ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. महाराष्ट्रातील थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. हे एक जागृत गणेशस्थान आहे. इ.स. १६५५ मध्ये मोरया गोसावी यांनी येथे जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १६५९ मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी येथे मंदिर उभारले. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे श्री समर्थ रामदास, श्री संत तुकाराम महाराज हेही या स्थानाचे भक्त होते.