* द्राक्ष वेलीच्या औषध फवारणीपूर्वी द्राक्ष वेलीची पांढरी मुळी कार्यक्षम आहे का, ती पहावी.
* औषध फवारणीसाठी वापरण्यात येणार्या पाण्याचा पी. एच. ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा.
* एखादे आंतरप्रवाही औषध फवारले तर त्यानंतरची फवारणी ही स्पर्शजन्य औषधाची करावी.
* आंतरप्रवाही किटकनाशकानंतर आंतरप्रवाही किटकनाशक फवारू नये. त्यामध्ये स्पर्शजन्य औषधाची फवारणी करावी.
* जैविक बुरशीनाशकाची फवारणी करताना टँकमधील पूर्वीचे औषध काढून टाकावे.
* कोणत्याही औषधाची फवारणी करताना औषध शोषून घेेणार्या स्प्रेडरचा वापर करावा.
* अतिकडक औषधे उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर फवारावीत.
* फवारणी करतेवेळी स्क्रॅचिंग येणार नाही, याची काळजी घ्यावी.