Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

दरमहा पगाराप्रमाणे उत्पन्न मिळवून देते रेशीम शेती

रेशीम उदयोग हा मोठया प्रमाणाव रोजगार उपलब्ध करुन देणारा उदयोग आहे. या उदयोगामुळे शेतक-यास दरमहा वेतनाप्रमाणे सहज व घरबसल्या उत्पन्न मिळु शकते. त्यांच्या घरातील वृध्द, अपंग व्यक्ती, स्त्रिया, मुले हे सुध्दा या उदयेागात हातभार लाऊ शकतात. महाराष्ट्र राज्य रेशीम उत्पादक अपारंपारिक राज्यामध्ये आघाडीवर आहे. 2007-08 पासुन तुती रेशीम कोष उत्पादनामध्ये महाराष्टाने जम्‍मु–काश्मिर या पारंपारिक रेशीम उत्पादक राज्याला मागे टाकले.  कर्नाटक, आंध्रपदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडु या राज्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. या उदयोगास असणा-या अनुकूल हवामानामुळे उदयेागाच्या प्रगतीला वाव असुन मागील पाच वर्षात राज्यात रेशीम किटक संगोपनामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

 तुती लागवड

हवामान : महाराष्ट्र राज्याचे कृषि विषयक हवामान तुती लागवडीसाठी योग्य आहे. तुती लागवड ही 750 ते 1000 मि.मी. पाऊस व समुद्रसपाटीपासुन 300 ते 900 मी. उंचीपर्यंतच्या विभागात करता येते. तुती लागवडीस थंड व उष्ण दोन्हीही प्रकारचे हवामान मानवते. परंतु 25 ते 32 सें. हे तापमान व 65 ते 80 टक्के सापेक्ष आर्दता असणा-या पोषक हवामानात तुतीची वर्षभर जोमाने वाढ होते व चांगले उत्पन्‍न घेता येते.

जमीन : तुती हे बहुवर्षीय पिक आहे. एका तुतीची लागवड केल्यास ती 15 ते 20 वर्षे टिकते. हलकी, मध्यम व भारी आशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते. मात्र तुतीच्या झाडाची मुळे खोलवर जात असल्यामुळे काळी कसदार किंवा मध्यम सपाट व पाण्याचा निचरा होणारी किंचीत उताराची जमिन लागवडीसाठी योग्य ठरते. जमिनीचा सामु 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. परंतु चिबड व पाण्याचा निचरा न होणारी जमिन या पिकास योग्‍य नाही.

जमिनीची मशागत : जमिनीची पुर्व मशागतीची कामे उन्हाळयात ते महिन्यापुर्वीच पुर्ण करावे. म्हणजे जुन-जुलै महिन्यापर्यंत जमीन तयार करुन लागवड करता येते. जमिन लोखंडी नांगराने किंवा ट्रॅक्टरच्या साहयाने 12 ते 15 इंच खोल नांगरट करावी. नांगरणी नंतर जमिन 15–20 दिवस तशीच तापु दयावी आणि काडी कचरा वेचुन ढेकळे फोडुन वखराच्या साहयाने समपातळीत करुन घ्यावीत.  त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोष्ट खत जमिनीत सारख्या प्रमाणात पसरुन घ्यावे.

वाणाची निवड : तुतीचे अनेक वाण प्रसारीत करण्यात आले आहेत.  रेशीम उदयेागाच्या यशस्वी उत्पन्नाच्या 38.2 टक्के भाग सकस तुती पानांच्या उपलब्धतेवर अवलंबुन असल्याने लागवडीसाठी योग्य वाणाची निवड खुपच महत्वाची आहे. आज राज्यात एम 5, एस 36, आणि एस 54 या जातीची वाढ चांगली होऊन पानाचे अधिक उत्पाउदन मिळते. म्हैसुर येथे व्ही 1 ही सुधारीत जात विकसीत करण्यात आली असुन या जातीचे एकरी पानाचे उत्पादन 20–25 हजार किलो पर्यंत येऊ शकते. खताची वाढीव मात्रा व चांगल्या दर्जाच्या जमिनीमध्ये ही जात लागवडीस अत्यंत फायदेशीर आहे.

तुती बेण्याची निवड व प्रक्रीया : तुती लागवड ही तुती बेण्यापासुन करावयाची असते. त्यासाठी साधारण 6 ते 8 महिने जुने व बागेस पाणी दिलेले तुतीचे बेणे म्हणुन वापर करावा. या फांदया रंगाने भुरकट व आकाराने 10–15 मि. मी. जाडीच्या 18 ते 20 सें.मी. लांबीच्या आणि 3 ते 4 डोळे असलेल्या असाव्यात. कलमे तीक्ष्ण हत्याराच्या साहयाने, डोळयालगत तिरपा काप घेऊन तर वरच्या भागाचा काप सिकेटरच्या साहयाने डोळयाच्या वर आडवा घ्यावा. लागवड कलमाचे 2/3 भाग जमिनीच्या आत, 1/3 भाग जमिनीच्या वर राहील व कलम उलटे लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी. बुरशीपासुन बचाव करण्यासाठी 1 टक्के कारबेंडाझीम द्रावणामध्ये तुतीचे बेणे अर्धा तास बुडवुन ठेवावीत.

तुती लागवड पध्दत : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ परभणी येथे केलेल्या संशोधनातुन असे निदर्शनास आले की आय जे पध्दतीने (5 x 3) x 2 फुट लागवड केल्याने भरपुर सुर्यप्रकाश व दोन ओळीतील अंतर जास्त असल्यामुळे पाल्याची प्रत चांगली राहते, आंतरमशागत सहज करता येते. या पध्दतीत झाडाची संख्या जास्त बसत असुन एकरी 10 गुंठे एवढयाच क्षेत्राला पाणी दयावे लागते. त्यामुळे प्रति एकरी पाल्याच्या उत्पादनात 3 x 3 फुट लागवड पध्दतीपेक्षा दुपटीने वाढ होते. ठिंबक सिंचन करायचे झाल्यास पटटा पध्दतीने अधिक सोईचे होते. त्याचबरोबर दोन एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर तुती लागवड आधुनिक पध्दतीने करावयाची असल्यास दोन पटयातील अंतर 6 ते 7 फुटापर्यंत वाढवता येते म्हणजे (6 x 3 x 2) किंवा (7 x 3 x 2) फुट अंतरावर केल्यास अंतर मशागत यंत्राच्या सहायाने करत येते.  मजुरीच्या खर्चात बचत होते आणि धान्याच्या उत्पादनात वाढ होऊन रेशीम किटकांना खादय फांदि पध्दतीने देणे सोईचे होते.

खताची मात्रा : तुतीच्या दर्जेदार व भरपुर अन्नघ्टक युक्त पानांच्या उत्पादनासाठी शेणखतासोबत गरजेनुसार रासायनिक खतांची मात्रा देणे आवश्यक आहे. तुती बागेत माती परिक्षण करुन रासायनिक खतांची मात्रा दयावी.

प्रथम वर्ष

लागवडीनंतर 2 ते 2.5 महिन्यांनी 20 : 20: 20: किनत्र : स्फुरद : पालाश प्रति एकर
पहिल्या पिकानंतर 15 दिवसांनी 20 : 00 : 00 किनत्र स्फुरद : पालाश प्रति एकर
दुसया वर्षापासुन सेंद्रिय खत व खत पाच सम भागात विभागुन प्रति एकरी दयावा
पिक शेणखत (टन) नत्र (कि) स्फुरद (कि) पालाश (कि)
1 1.6 28 12 12
2 1.6 28 12 12
3 1.6 28 12 12
4 1.6 28 12 12
5 1.6 28 12 12
8.0 140 60 60

पानाची / फादयांची तोडणी : प्रथम वर्षी तुती लागवड झाल्यापासुन साधारणपणे 3 ते 4 महिन्यात झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते व पाने रेशीम किटकांना देण्यास योग्य होतात. एक किलो कोष निर्मितीसाठी 20 किलो पाला लागतो. पहिल्या वर्षी 1 एकर बागेत पाल्याची साधारणपणे 3–4 हजार किलो पर्यंत व दुस-या वर्षापासुन वानानुसार 12 ते 25 हजार किलो पर्यंत एकरी उत्पादन येते. एक एकर क्षेत्राची दोन भागात विभागणी करुन अर्ध्या भागावर एक पिक या पध्दतीने स्वतंत्रपणे दोन पिके घेता येतात. फांदयाची एक तोडणी / छाटणी झाल्यानंतर 60 दिवसांत पुन्हा नवीन पिक घेता येते. यामुळे दुस-या बॅचमध्ये अंतर राहुन त्याचा फायदा शेतीची कामे जसे निर्जुंतीकरण, तुती बागेची कामे इत्यादीसाठी होतो व त्यामुळे उदयोग किचकटीचा वाटत नाही.

आंतर मशागत : तुतीची लागवड केल्यानंतर बाण तणविरहीत ठेवण्यासाठी साधारणपणे पहिली 1 ते 1.5 व दुसरी 2 ते 2.5 महिन्यांनी खुरपणी करावी. (पहिल्या अडीच महिन्यापर्यंत बैलाच्या साहयाने आंतर मशागत करु नये) पानाच्या / फांदया प्रत्येक तोडणीनंतर बैलाच्या साहयाने आंतर मशागत करता येते.

पाणी व्यवस्थापन : महाराष्ट्र राज्यात तुतीची लागडव जुन ते ऑगस्ट महिन्यापर्यंत केली जाते आणि नवीन लागवडीस पावसाचा फायदा होतो. परंतु पावसाचा अनियमितपणा जाणवल्यास, जमिनीच्या प्रतीनुसार 8–12 दिवसांच्या अंतराने नियमित पाळया दयाव्यात. पाण्याची कमतरता असेल तर ठिबक सिंचनाचा वापर करता येऊ शकतो. प्रथमत: 1-2 तास प्रति दिन संच जमिनीच्या मगदुरा प्रमाणे चालवावा.

      वरिल प्रमाणे आधुनिक पध्दतीने तुतीची लागवड केल्यास चांगल्या प्रतीचे तुतीची पाने रेशीम अळयास खाऊ घालुन रेशीम कोषाचे भरघोस उत्पन्न घेता येईल.

 रेशमी किटक संगोपन

रेशीम उदयेागातील दुसरा महत्वाचा भाग म्हणजे रेशीम किटक संगोपन करणे हे होय. रेशीम किटकाचे शास्त्रीय पध्दतीने संगोपन केल्यास चांगल्या प्रतीचे व भरपुर रेशीम कोषाचे उत्पन्न मिळेल.

रेशीम किटक संगोपन गृह : यशस्वी कोष उत्पादनाकरीता किटक संगोपन गृहामध्ये खेळती हवा, अनुकूल वातावरण व हवामान नियंत्रण करण्याच्या सोयी असणे आवश्यक आहे. तसेच बाल्यावस्था व प्रौढ अवस्था संगोपन गृह वेगवेगळे असणे गरजेचे आहे.

बाल्य अवस्था किटक संगोपन गृह                    : 10 x 14 x उंची 10 फुट

प्रौढ किटक संगोपन गृह (250 अंडीपुंज / बॅच / एकर)    : 82 x 23 x उंची 15 फुट

पाने / फांदया साठविण्याची खोली                     : 12 x 06 x उंची x 10 फुट

कोष विणणगृह                                    : 12 x 17 x उंची 10 फुट

रॅक                                             : 55 x 5 फुट (4 ताळी) प्रत्येकी दोन

निर्जतुकीकरण : प्रभावी निर्जंतुकीकरण व अनुकूलता यामुळे रोगनियंत्रण करता येते. संगोपन संपल्याबरोबर गृहाचे प्रथम निर्जंतुकीकरण व दुसरे अंडी उबवणीच्या 5 ते 6 दिवस अगोदर करणे आवश्क आहे.  संगोपन साहित्यांना धुवून स्वच्छ करुन व निर्जतुकीकरण 5 ते 6 तास उन्हात वाळत ठेवावे. निर्जंतुके फवारणीसाठी पॉवर स्र्पेयर किंवा जेट स्प्रेयरचा वापर करावा.

निर्जंतुके : 1. फॉरमॅलीन 2. ब्लिचींग पावडर 3. चुना 4. क्लोरिनडाय ऑक्साईड 5. अस्त्र

रेशीम किटकांना होणाया रोगाची लक्ष्णे व त्यावरील उपाय  

ग्रासरी : रेशीम अळयांना त्वचेमध्ये बदल होतो आणि रोगग्रस्त अळयांच्या शरीरामधुन पांढ-या किंवा पिवळया रंगाचा द्रव बाहेर पडतो. अळयांच्या दोन वलयांमध्ये सुज आढळुन येते.

फलॅचरी : या रोगामुळे रेशीम किटकांच्या शरीरावर सुज येते व कालांतराने अळया काळया पडतात.

बुरशी रोग (मस्करडाईन) : या रोगामुळे रेागग्रस्त किटकांची भुक व त्याची हालचाल थांबते.  मेलेल्या अळयांचे शरीर कठीण होते व बुरशीचे पांढरे आवरण त्याच्या शरीरावर तयार झाल्यामुळे शरीर खडयासारखे दिसते.

पेब्रीन : हा रोग मादी पतंगापासुन अंडीमध्ये येतो. या रोगामुळे अळयांची अनियमित वाढ होते. कात टाकण्याच्या अवस्था मागे पुढे होतात आणि त्यामुळे सर्व अवस्थेच्या अळया संगोपन करतांना आढळतात.  अळीच्या अंगावर काळसर ठिपके दिसतात.

उपाय :

  1. संगोपनगृहाचे फॉर्मेलीन,ब्लिचींग पावडर, चुना आणि क्लोरीन डायऑक्साईड यांच्या साहयाने संगोपन संपल्यानंतर लगेचच व संगापेन सुरु करण्यापुर्वी निरजंतुकीकरण करावे.
  2. रोग विरहीत अंडीपुंजाचा वापर करावा.
  3. संगोपन गृहात आणि नेत्रिका ठेवतात त्या जागी योग्य तापमान व आर्द्रता कायम ठेवावी.
  4. अळयांना चांगल्या प्रतीचे खादय खाऊ घालावे आणि साधारणत: 100संकरीत अंडीपुंजासाठी700 चौ. फुट जागा उपलब्ध करावी.

रेशीम किटक निर्जतुक खालील प्रमाणे वापर करावे

अ.क्र. वापरण्याच्या वेळा 100 अंडीपुजासाठी प्रमाण (ग्रॅम)
1 1 ल्या वेळी कात टाकल्यानंतर 60
2 2 –या वेळी कात टाकल्यानंतर 120
3 3 –या वेळी कात टाकल्यानंतर 580
4 4 थ्या वेळी कात टाकल्यानंतर 860
5 5 व्या वेळी कात टाकल्यानंतर 1540

टिपणी : 1. पातळ कापडाच्या साहयाने अळयांवर औषधाची भुकटी धुरळावी. 2. प्रत्येक वेळी कात टाकल्यानंतर खादय देण्याच्या अर्धा तास अगोदर पावडर धुरळावी.

अंडीपंजाची घ्यावयाची काळजी :

बाल्य अवस्था किटक संगोपन (100 अंडी पुंजासाठी)

अवस्था दिवस खादयाच्या वेळा ट्रेची संख्या

(3 x 2)

पानाचा आकार

(से.मी.)

इतर
पहिली अवस्था तापमान

27-28 से.

आर्द्रता

90 %

1 8.30

4.00

1 0.5 x 0.5

0.5 x 0.5

ब्रशींग करणे

अंतर वाढवुन खादय देणे

2 9.30

4.00

2

4

1.0 x 1.0

1.0 x 1.0

अंतर वाढवुन खादय देणे
3 8.30

4.30

4

4

1.5 x 1.5

1.5 x 1.5

अंतर वाढवुन खादय देणे
4 9.30 0.5 x 0.5 अंतर वाढवुन चुना भुकटी देणे
कालावधी 3.5 दिवस
दुसरी अवस्था

तापमान

26-27 से.

आर्द्रता

85 %

5 9.30

4.30

4

8

2.0 x 2.0

4.0 x 4.0

विजेता टाकणे व जाळया अंथरुन बेडची सफाई व अंतर वाढविणे
6 9.30

4.30

8

12

1.5 x 1.5

1.5 x 1.5

अंतर वाढविणे
7 9.30 12 1.0 x 1.0 अंतर वाढवुन चुन्याची धुरळणी करावी.

कातीवरील अळीची लक्षणे

कातीवरील अळीची लक्षणे : कातीवरील अळीची लक्षणे बघुन खादयाचे प्रमाण कमी करत तिस-या किंवा चौथ्या खादयाच्या वेळी पुर्णत: बंद करावे. अशा अवस्थेमध्ये ट्रे एकमेकांवर न ठेवता एक ट्रे एका स्टॅडवर वेगळा ठेवावा. 24 तास या ट्रेची कोणत्याही प्रकारची हालचाल होऊ देऊ नये. यानंतर चुन्याची भुकटी 4 – 5 ग्रॅ / स्के. फुट या प्रमाणात हळुवार धुरळणी व दरवाजे खिडक्या उघडया करुन ठेवाव्यात. अळया कात टाकल्यानंतर जेंव्हा खादयासाठी हालचाल करु लागतात. त्यावेळी विजेता पावडरची धुरळणी करुनच 25 – 30 मिनीटानंतर अळयांना खादय देण्यात यावे.

कालावधी 2.5 दिवस

अवस्था दिवस खादयाच्या वेळा इतर
तिसरी अवस्था

तापमान

25 – 26 से.

आर्द्रता

75-80 %

8 9.30

4.00

90 टक्के पेक्षा जास्त आळया कात टाकुन झाले तर त्यांना सफाई करुन खादय टाकावे.
9 9.30

4.30

अळयाची स्वच्छता करुनच अळयांना शुट रॅकवर वर्तमान पत्रावर ठेवण्यात याव्यात व फांदी पध्दतीने खादयाची सुरुवात करावी.
10 9.30

4.30

फांदी पध्दतीने खादय दयावे.
11 9.30

4.30

अळयात कात अवस्थेवर जात असतील तर खादय कमी करावे
12 खादय बंद करुन चुन्याची धुरळणी करावी.

कालावधी 3.5 दिवस

अवस्था दिवस खादयाच्या वेळा इतर
चौथी अवस्था

तापमान

24–25 से. आर्द्रता

70-75%

13 9.30

4.00

कात टाकल्यानंतर विजेता टाकावे आणि खादय दयावे
14 9.30

4.30

अळयांचे अंतर वाढवुन खादय दयावे
15 9.30

4.30

अळयांचे अंतर वाढवुन खादय दयावे
16 9.30

4.30

अळयात कात अवस्थेत जात आहेत हे पाहुन खादय कमी करावे. 90 टकके अळया कात अवस्थेवर स्थिर झाल्यास खादय पुर्ण बंद करुन चुना टाकावा.

कालावधी 3.5 दिवस

अवस्था दिवस खादयाच्या वेळा इतर
पाचवी अवस्था तापमान

24–25 से. आर्द्रता

70-75%

17 8.00

2.00

9.00

90 टक्के पेक्षा अधिक अळया कात टाकल्या असतील तर विजेता पावडर टाकावे व खादय दयावे
18 8.00

2.00

9.00

अंतर वाढवुन खादय दयावे
19 8.00

2.00

9.00

अंतर वाढवुन निर्जंतुक टाकुन खादय दयावे
20 8.00

2.00

9.00

अंतर वाढवुन अळयांचे निरीक्षण करावे
21 8.00

2.00

9.00

अंतर वाढवुन निर्जंतुक करुन खादय दयावे
22 8.00

2.00

9.00

खादय दयावे
23 8.00

2.00

9.00

खादय दयावे
24 8.00

2.00

9.00

अळयांचे निरीक्षक करावे त्या कोषावर जाण्यास तयार आहेत का पाहुन खादय कमी करावे

अळया कोषावर जातानाची लक्षणे व कोष बांधणी :

अशा प्रकारे रेशीम किटकांचे संगोपन केल्यास चांगल्या प्रतीच्या कोषाचे अपेक्षित उत्पन्न मिळते.  साधारणत: 100 अंडीपुंजापासुन 65 ते 70 कि. ग्रॅ कोषाचे उत्पादन होऊन दरवर्षी 1250 अंडीपुंजापासुन 815 कि.ग्रॅ. कोष उत्पादन मिळते आणि त्यापासुन एकरी रु. 2 लाख 18 हजार एवढे धन प्राप्त होते.

रेशमी किटक संगोपनगृह : भारत हा कृषिप्रधान देश असुन उदयोग धंधासाठी लागणारा कच्चा माल मुख्यत्वे करुन शेती मधुनच मिळतो.  रेशीम हा रोजगारभिमुख उदयोग असुन ग्रामीण स्तरावर प्रचंड रोजगार निर्मितीची क्षमता या उदयेागात आहे. त्याचबरोबर खेडयाकडुन शहराकडे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आणि ग्रामीण स्तरावर उदयोग रोजगा निर्मिती स्थापीत करण्यासाठी शेतीवर आधारीत उदयोगांना शासनाने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. रेशीम उदयोग करण्यसाठी पक्कया संगोपनागृहाची आवश्यकता असताना देशातील 80 टक्के शेतकरी मात्र कच्चा शेड नेट किंवा संगापेनागृहात रेशीम उदयोग करतात.  कारण देशात अल्पभुधारक शेतकरी रेशीम उदयोग करतात, त्यामुळे पक्‍के किटकसंगोपन गृह बांधणीसाठी आर्थिक गुंतवणुन करणे त्यांना शक्य होत नाही.

      रेशीम किटक संगोपनागृहात 22 ते 28 अंश सेल्सीयस तापमान व 80 ते 85 टक्के सापेक्षा आर्द्रता ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात कच्‍च्‍या शेडनेट मध्ये पावसाळा व हिवाळा या ऋतुतील 8 महिनेच हा उदयोग करणे शक्य आहे. कारण कच्चा शेडमध्ये रेशीम किटक वाढीसाठी आवश्यक तापमान व सापेक्ष आर्द्रता नियंत्रीत करणे शक्य होत नाही आणि त्यामुळेच रेशीम किटक तुती पाने खात नाहीत व त्याचा सरळ परिणाम किटकाच्या वाढीवर होवुन रेशीम कोष उत्पादनात घट होते. पर्यांयाने शेतक-याचे नुकसान होते. तुती लागवड क्षेत्रानुसार किटक संगोपन गृहाचे बांधकाम होणे आवश्यक आहे. अर्धा, एक, दीड, आणि दोन एकर तुती लागवड असणा-या शेतक-यांसाठी किटक संगोपन गृह आराखडा खालीलप्रमाणे असावा.

दोन एकर तुती लागवडीसाठी किटक संगोपनगृह आराखडा
·         तुती बागेचे एकुण क्षेत्र 2 एकर
·         कोषाचे पिक/वर्ष 5 पीके
·         अंडीपुज घेण्याची क्षमता 550 ते 600 अंडीपुंज
·         100 अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र 700 ते 750 चौ.फुट
·         600 अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र 4500 चौ. फुट
·         किटक संगोपन गृह आकार 160 x 23 x 15 फुट
·         संगोपनगृह (70 x 23) x 2 फुट हॉल
·         तुती फांदया साठवण गृह 20 x 8 फुट
·         एक संगोपन रॅकचे चटई क्षेत्र 30 x 5  = 150 चौ. फुट
·         चार ताळी चार रॅकचे चटई क्षेत्र 150 चौ.फुट x 4 = 600
·         आठ रॅक x 600 चौफुट 4800 चौ.फुट
·         पाने पुरवठा गृह 8 x 10  फुट
·         बाल्य किटक संगोपनगृह 14 x 10 फुट
दिड एकर तुती लागवडीसाठी किटक संगोपनगृह आराखडा
·         तुती बागेचे एकुण क्षेत्र 1 एकर
·         कोषाचे पिक/वर्ष 5 पीके
·         एका वेळी जास्तीत जास्त अंडीपुज घेण्याची क्षमता 250 ते 300 रोगमुक्त अंडीपुंज
·         100 अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र 700 ते 750 चौ.फुट
·         450 अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र 3375 चौ. फुट
·         किटक संगोपन गृह आकार 108 x 23 x 15 फुट
·         संगोपनगृह 96 x 23 फुट हॉल
·         तुती फांदया साठवण गृह 12 x 13 फुट
·         उझी माशी/चॉकी संगोपन गृह 12 x 6 फुट
·         एका बेड चटई क्षेत्र आकार 43 x 5 = 215 चौ. फुट
·         चार ताळी एका रॅकचे चटई क्षेत्र 215 चौ.फुट x 4 = 860 चौ.फुट
·         चार ताळी एका रॅकचे चटई क्षेत्र 860 चौ.फुट x 4 = 3440 चौ.फुट
एक एकर तुती लागवडीसाठी किटक संगोपनगृह आराखडा
·         तुती बागेचे एकुण क्षेत्र 1 एकर
·         कोषाचे पिक/वर्ष 5 पीके
·         एका वेळी जास्तीत जास्त अंडीपुज घेण्याची क्षमता 250 ते 300 रोगमुक्त अंडीपुंज
·         100 अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र 700 ते 750 चौ.फुट
·         किटक संगोपन गृह आकार 82 x 23 x 15 फुट
·         संगोपनगृह 70 x 23 फुट
·         तुती फांदया साठवण गृह 12 x 13 फुट
·         बाल्य किटक संगोपनगृह 12 x 10 फुट
·         एका रॅकसाठी लागणारे चटई क्षेत्र 30 x 5 = 150 चौ फुट
·         चार ताळी एका रॅकचे चटई क्षेत्र 150 x 4 = 600 चौ.फुट
·         चार ताळी दोन रॅकचे चटई क्षेत्र 600 चौ. फुट x 4 = 2400 चौ.फुट
दिड एकर तुती लागवडीसाठी किटक संगोपनगृह आराखडा
·         तुती बागेचे एकुण क्षेत्र अर्धा एकर
·         कोषाचे पिक/वर्ष 5 पीके
·         एका वेळी जास्तीत जास्त अंडीपुज घेण्याची क्षमता 125 ते 150 रोगमुक्त अंडीपुंज
·         100 अंडीपुजासाठी लागणारे एकुण चटई क्षेत्र 700 ते 750 चौ.फुट
·         किटक संगोपन गृह आकार 45 x 23 x 15 फुट
·         संगोपनगृह 35 x 23 फुट
·         तुती फांदया साठवण गृह 8 x 13 फुट
·         बाल्य किटक संगोपनगृह 8 x 10 फुट
·         एका रॅकसाठी लागणारे चटई क्षेत्र 30 x 5 = 150 चौ फुट
·         चार ताळी एका रॅकचे चटई क्षेत्र 150 x 4 = 600 चौ.फुट
·         चार ताळी दोन रॅकचे चटई क्षेत्र 600 x 2 = 1200 चौ.फुट

(सौजन्य : वनापकृवि, परभणी )

Exit mobile version