वेलवर्गीय भाजीपाला (उदा. काकडी, भोपळा, कारली) पिकांवरील फळमाशीचे नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे काढून नष्ट करावीत. प्रौढ माशीसाठी क्युलयूर रसायनयुक्त सापळे एकरी ५ या प्रमाणात लावावेत. तसेच २० मि. लि. एन्डोसल्फान + १०० ग्रॅम गूळ + १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. टोमॅटो, वांगी, मिरची पिकांवर ‘मर’ रोगाची लक्षणे दिसताच ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॅप्टन किंवा १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम
१० लिटर पाण्यात मिसळून ५० ते १०० मि. लि. या प्रमाणात बुंध्याशी रिंग करून ओतावे.
भेंडी
भेंडी पिकावर फळे पोखरणार्या अळीचा प्रादूर्भाव. त्यासाठी
५ मि. लि. डेल्टामेथ्रीन किंवा १० मि. लि. प्रोफेनॉफॉस किंवा ४ टक्के निंबोळी अर्क प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
मिरची
मिरची पिकावर पानांवरील ठिपके या रोगाचा प्रादूर्भावसाठी मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम
१० लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.
टोमॅटो
ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर ‘करपा’ रोगाच्या नियंत्रणासाठी २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा २५ ग्रॅम क्लोरोथॅलोनील प्रति १० लिटर पाणी +
१० मि. लि. स्टिकर यांची १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पावसाची शक्यता असल्याने स्टिकर वापरणे आवश्यक आहे.
वांगी
वांगी पिकावर रस शोषणार्या किडींच्या नियंत्रणाकरिता ४ मि. लि. इमिडॅक्लोप्रिड किंवा १० मि. लि. कार्बोसल्फान + १० लिटर पाणी + १० मि. लि. स्टिकर या प्रमाणात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. फळे व शेंडे पोखरणार्या अळीच्या नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अर्क किंवा २० मि. लि. प्रोफेनोफॉस प्रमाणात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
– अधिष्ठाता (कृषी) व संचालक (शिक्षण),
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,
जि. अहमदनगर, दू. क्र. ०२४२६-२४३२०६