अशी राखा कोंबडयांची निगा

कोंबडयांची निगा : कोंबडयांचे तीन गट पडतात. पहिला गट आठवडयापर्यत, दुसरा 9 ते 18 – 20 आठवडयापर्यंत व तिसरा 18 – 20 आठवडयानंतर. खाद्याचे देखील तीन प्रकार असतात. आठ आठवडयापर्यंत चिक मॅश, 9 – 16 / 18 आठवडयांपर्यंत ग्रोअरमॅश व त्‍यानंतर लेअर मॅश असे म्‍हणतात. या तिन्‍ही प्रथिनांचे प्रमाण अनुक्रमे 22,14 व 16 टक्‍के असावे. खाद्यात दोन प्रकारचे अन्‍नघटक असावेत. 1) ऊर्जा पुरविणारे 2) प्रथिने पुरविणारे. ऊर्जा पुरवियासाठी मका, ज्‍वारी, बाजरी, बारली, गहू ही धान्‍ये वापरतात तर प्रथिनांसाठी शेंगदाणा, सोयाबीन, तीळ पेंड तसेच मासे, मटण, खत इत्‍यादींचा उपयोग करावा.

कोंबडयांचे खादय : एकूण खर्चाच्‍या 60 – 70 टक्‍के खर्च खाद्यावर होतो. त्‍यासाठी ते किफायतशीर ठरण्‍यासाठी खादय संपूर्णत: व चांगले असावे. खादय वाया जाणार नाही अशा चांगल्‍या भांडयात अर्धेभरुन व्‍य‍वस्थित खाऊ घालावे.

खाद्यातील अन्‍नघटक (टक्‍के):

 

खादयाचा प्रकार वय आठवडे प्रथिने स्निग्‍ध पदार्थ तंतुमय पदार्थ स्‍फुरद रोज प्रत्‍येकी खादय (ग्रॉम)
चिकमॅश (पिल्‍ले) 1 – 8 22 3.4 3.4 0.6 35
ग्रोअरमॅश (तलंग) 8 – 20 18 3.4 4.5 0.6 80
लेअरमॅश (अंडयावरील कोंबडया) 20 – 72 17 3.4 5.6 1.2 110

शंभर कोंबडयांना लागणारे एकूण खादय (किलो / आठवडयात)

वय (आठवडयात) खादय (किलो) वय (आठवडे) खादय (किलो)
1 07 10 52
2 13 11 55
3 19 12 57
4 26 13 59
5 32 14 63
6 40 15 65
7 45 16 65
8 48 17 70
9 50 20 पुढे 77

 

पाण्‍याची व्‍यवस्‍था / उपकरणे व भांडी :

पाण्‍याची भांडी रोज स्‍वच्‍छ व ताज्‍या पाण्‍याने भरावीत त्‍यावर झाकण असावे. पाण्‍याची भांडी उंच विटावर ठेवावीत व विटास चुना लावावा. त्‍यामुळे पाणी गादीवर सांडणार नाही व घरे कोरडी राहण्‍यास मदत मिळेल. भांडी दररोज स्‍वच्‍छ करुन भरावीत. अंडी देणा-या, मांसल कोंबडयासाठी साधारणत: 50 पक्षास एक खादयाचे भांडे ठेवावे. कोंबडखान्‍यात खादयाची व पाण्‍याची भांडी तसेच अंडी देण्‍यासाठी पक्षास खुराडे लागते. एका पक्षास 2 – 4 इंच खादयाची व अर्धा ते दोन इंच पाण्‍याची जागा लागते म्‍हणजे 2 फुट लांब खादयाचे भांडे 24 कोंबडयांना लागते तर पाण्‍याचे भांडे एक ते दीड फुट पुरे होते. पाणी सांडू नये म्‍हणून भांडे विटांच्‍या चौथ-यावर ठेवावे. पाच कोंबडयांना अंडी देण्‍यासाठी 14 x 12 x 12 इंच आकाराचा एक खुराडा जमिनीपेक्षा दीड ते दोन फुट उंच ठेवावा.

 

रोगापासून बचाव : लस टोचणीचा तक्‍ता

वय रोग लसीचे नांव टोचणीची पध्‍दत
1 दिवस मॅरेक्‍स मॅरेक्‍स पाण्‍याच्‍या स्‍नायूमध्‍ये
5–7 दिवस राणीखेत लासोटा नाकात एक थेंब टाका
4 आठवडे श्‍वसनलिकेचा संसर्गजन्‍य रोग लासोटा डोळयात दोन थेंब टाका
5 आठवडे राणीखेत लासोटा पिण्‍याच्‍या पाण्‍यातून
6 आठवडे देवी देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
8 आठवडे राणीखेत राणीखेत आर 2 बी पंखाखाली कातडीतून टोचून
18 आठवडे देवी देवी लस पंखाखाली कातडीतून टोचून
20 आठवडे राणीखेत राणीखेत आर 2 बी पंखाखाली कातडीतून टोचून
22 आठवडे पिसे उपटणे चोचीचा शेंडा कापावा
10–12  आठवडे पिसे उपटणे वरच्‍या चोचीचा शेंडा कापून डाग देऊन बोथट करावा.

 

इतर रोग व जंतू

रोग लसीचे नांव टोचणीची पध्‍दत
1) कॉक्सिडिऑसिस ओलसर पणामुळे केंव्‍हाही होतो. कॉक्सिडिओस्‍टॅट, बायफ्रुरॉन – फूरानीन इ. दयावी. गादी कोरडी करावी.
2) जंत सर्व वयात होतात जंताचे औषध दर 3 महिन्‍यांनी पाण्‍यातून दयावे, स्‍वच्‍छता ठेवावी.
3) अंगावरील उवा गोचीड, पिसवा इ. सर्व वयात होतात स्‍वच्‍छता ठेवावी, पक्षी / मॅलॅबियॉन / सुमीथियॉनने फवारावेत.

 

निरनिराळया वयाचे पक्षी वेगळे ठेवावेत. कोंबडयात नवीन व्‍यक्‍तीस किंवा पाहणा-यांना येऊ देऊ नये. दाराजवळ फिनार्इल मिश्रीत पाण्‍याचे ट्रे ठेवावेत, त्‍यात पाय बुडवून आत जावे. कोंबडी अंडी द्यायला सुरवात केल्‍यापासून 10 – 12 महिने अंडी देते. अंडयावर असतांना त्‍यांना 14 तास प्रकाश लागतो. अंडी दिवसांतून 2 – 3 वेळा गोळा करावीत, त्‍यामुळे फुट कमी होते व स्‍वच्‍छ अंडी मिळतात.

 

अंडी उबवणूक केंद्र : अंडी देणा-या कोंबडयांसाठी पिल्‍ले मिळण्‍यासाठी

(1) वेंकटेश्‍वर हॅचरीज प्रा. लि.

वेंकटेश्‍वर हाऊस एस. एन. 114 / 0 / 02, विठठलवाडी सिंहगड रोड, पुणे

जात : बी. व्‍ही. 360, बी. व्‍ही. 360

(2) पूना पर्ल,

पोल्‍ट्री बिल्‍डींग फॉर्म, 225 / 9, अ, हडपसर पुणे 411028

जात : पर्ल रुपाली, पर्ल सोनाली

(3) सेंट्रल पोल्‍ट्री बिल्डिंग फार्म

आरे मिल्‍क कॉलनी, गोरेगांव, मुंबई 400065

जात : बी. एच. – 78

(4) सेंट्रल हॅचरीज, पोल्‍ट्री बिल्डिंग फार्म

पूणे – मुंबई रस्‍ता, खडकी पूणे – 9

(5) बाळकृष्‍ण हॅचरीज,

श्रीकृपा ब्रम्‍हपुरी, मिरज 416410