(१) पशुपालनाचा धंदा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरविण्यासाठी संतुलित आहार, जनावरांची निगा, देखभाल नियमित प्रजनन या बाबी महत्वाच्या आहेत.
(२) प्रजोत्पादनाची क्रिया जनारांत माज दाखविण्यापासुन सुरु होते. नियमित माज दाखविण्याशी आहाराचा व शरीरीक्रियांचा जवळचा संबंध आहे.
(३) गाई व म्हशीतील माजाचा काळ सरासरी १२-१४ तास असतो.
(४) जनावरे भरविण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी माजावर आलेली जनावरे सायंकाळी व सायंकाळी माजावर आलेली जनावरे दुसरे दिवशी सकाळी भरविणे जास्त उपयुक्त ठरते.
(५) आपल्या गाई / म्हशीपासुन जास्त दुध देणा-या कालवडी / वगारी मिळविण्यासाठी कृत्रित रेतन पध्दतीचा अवलंब करावा.
(६) जनावरे भरल्यानंतर दोन महिन्यानंतर गाभण आहेत किंवा नाहीत याची खात्री करावी.
(७) नवजात वासराची भविष्यातील प्रजनन क्षमता त्याच्या गर्भावस्थेत झालेल्या पोषणाची संबंधीत असते. त्यासाठी गाभण जनावरांच्या आहाराची काळजी घेणे आवश्यक असते.
(८) गर्भ / वासरु चांगले वाढत जावुन सुलभ प्रसुति व्हावी व भरपुर दुध मिळावे यासाठी गाभण काळात जनावरांची निगा ठेवणे आवश्यक असते.
(९) व्याल्यावर ताबडतोब वासरु उचलुन घेतल्यास वासराशिवाय पान्हा सोडण्याची गायी / म्हशीना सवय लावता येते.
(१०) चांगल्या गायी / म्हशीकडुन ७ ते ८ वेतांची अपेक्षा असते. त्यासाठी जनावरे लवकर वयात यावीत व दोन वेतातील अंतर कमी असावे.
(११) पहिला माज दाखविण्यासाठी जनावरांचे वय १४ ते १८ महिने व वजन २५०-३०० किलो असणे आवश्यक असते.
(१२) दोन वेतातील अंतर कमी करण्यासाठी गाई म्हशी व्याल्यानंतर २ – ३ महिन्यांनी पुन्हा गाभण राहतील याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
(१३) वांझोटी जनावरे ठेवु नयेत.
(१४) वांझपणाची तक्रार फार मोठी शक्यता माज न ओळखल्याने असते. तेंव्हा मुका माज (प्रामुख्याने म्हशीत) असणारी जनावरे पशुवैद्यकाकडुन तपासुन घ्या व त्यांच्या सल्ल्यानुसार भरवावीत.
(१५) पशुपालनात गैरसमज / अंधश्रध्दा काडुन टाकणे आवश्यक आहे. नवजात वासरास (चीक) पहिले दुध जेवढया लवकर पाजता येईल तेवढे फायदयाचे.
(१६) गाभण काळातील अपघातासाठी, अडलेल्या जनावरांच्या प्रसतुतीसाठी, जननेंद्रियाच्या रोगासाठी, वांझपणाच्या औषधोपचारासाठी गावातील वैदुपेक्षा पशुवैद्यकांचाच सल्ला घेणे योग्य वाटते. वैदुच्या भोंदुपणाला बळी पडुन चांगले जनावर मोडीत काढु नका.