Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

तेलताड लागवडीतून खात्रीशीर फायदा

पामतेल सर्वांना माहित आहे. तेलताडाच्या फळांपासून मिळतं ते पामतेल. मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशांतील हा प्रमुख व्यवसाय आहे. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळात तेलताडाची सर्वाधिक लागवड आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन देशात तेलताड लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या देशातही तेलताड लागवडीला प्रोत्साहन दिल जात आहे. यासाठी केंद्र सरकार देशभरात तेलताड क्षेत्र विस्तार कार्यक्रम राबवत आहेत. खाद्यतेलाची वाढती गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने तेलताड अभिवृध्दी योजना हाती घेतली आहे.

तेलताड लागवडीला सिंधुदुर्ग जिल्हदयातील मुळदे ता.कुडाळ येथील उपवन विद्यालयाच्या् माध्य मातून नवसंजिवनी मिळणार आहे. विद्यालयात तेलताड अग्रस्थातनी ठेवून लागवड जोपासना आणि विक्री याबाबत सखोल मार्गदर्शन देण्याित येणार आहे. प्रती एकरी 60 हजार रूपयापर्यंत निव्वाळ नफा मिळवून देणारा तेलताड प्रकल्पर शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

तेलताड शेतीचे अनेक फायदे आहेत. तेलताडाचे उत्पापदन तिस-या वर्षी सुरू होते. त्यामनंतर दर महिन्याीला फळांची तोडणी होते. बाजारपेठेतील तेलाच्याा दरावर फळांना भाव दिला जातो. खाद्यतेलाच्याा दराचा विचार करता हे दर वाढतच जाणार असल्यााचे बाजारपेठेवरून दिसते. तेलताड प्रकल्पाामध्येन पहिल्या् चार वर्षापर्यंत कोणतेही पीक व त्या‍नंतर औषधी वनस्पतती, मसाला इ.आंतरपीके कायमस्वयरूपी घेता येतात.या शेतीसाठी मोफत तांत्रिक मार्गदर्शन मिळते.

केंद्र सरकार, राज्ये सरकार आणि कृषी क्षेत्रातील गोदरेज कंपनी यांच्या संयुक्तक विद्यमाने तेलताड योजनेची कार्यवाही करण्या,त येत आहे. तेलताड लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आणि वर्षभर पाण्याची सोय हवी. नऊ बाय नऊ मीटर अंतरावर रोपांची लागवड केली जाते. हेक्टरी साधारण 143 रोपं बसतात. तेलताडाची लागवड वर्षभर कधीही करता येते, पण जून ते डिसेंबर हा काळ चांगला आहे.

तेलताडावरील मादी फुलांपासून घड तयार होतात. खत-पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर झाडाला फुलं जास्त लागतात. लागवडीनंतर चौथ्या वर्षांपासून उत्पादन सुरु होतं. सुरुवातीचे तीन वर्ष हेक्टरी सात टन उत्पादन मिळतं. तर सात वर्षानंतर हेक्टरी 22 ते 25 टन उत्पादन मिळतंय.या योजनेसाठी शासनातर्फेही मोठे अर्थसहाय्य केले जाते.एकुणच पाहता तेलताड प्रकल्प हा शेतक-यांसाठी कमीत कमी कष्टालत आणि दीर्घकाळ खात्रीशीर उत्पगन्न देणारा आहे. यात फायदयाचे गणितही तुलनेन अधिक आहे अधिक माहिती करिता संबधित तालुका कृषी वैदयकीय अधिका-यांकडेही याची सविस्ततर माहिती जिल्हायातील शेतक-यांना मिळेल.

तेलताड फळांची चोरी होत नाही, तेलताडावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव नाही, त्यामुळे फवारणीचा खर्चही नाही, कमीत कमी मजुरांत ही शेती करता येते. एकदा लागवड केल्यानंतर 35 वर्ष उत्पादन मिळतं, म्हणजे दरवर्षी लागवडीचा खर्च नाही. कृषी विभागानं विक्रीचा करार केल्यामुळे फळांच्या मार्केटिंगचाही प्रश्नही मिटला. अशा या शेतीत सात वर्षांनतर हेक्टरी दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. वर्षानुवर्ष ऊस आणि पारंपरिक पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना तेलताड लागवडीची विचार करायला हरकत नाही.

संध्या गरवारे.जि.मा.अ.

नाबार्ड्च्या योजना

संपर्क

National Research Development Corporation
( A Government of India Enterprise )
20-22, Zamroodpur Community Center
Kailash Colony Extension
New Delhi 110 048. India
Ph: +91-11-26419904, 26417821, 26480767, 26432627
Fax: 011-26231877, 26460506, 26478010
Website: www.nrdcindia.com
mail: write2@nrdcindia.com

Exit mobile version