Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कपाशीवरील किडींचे असे करा व्यवस्थापन

मावा :

ही कीड १ ते २ मि.मि. लांब असून तिचा रंग पिवळा, हिरवा किंवा काळसर असतो. ही कीड आपले सोंडे सारखे तोंड झाडाच्या व पानाच्या ग्रंथीत खुपसून रस शोषण करते. ही कीड अंगातून मधासाखा चिकट पदार्थ बाहेर फेकते. त्यावर काळी बुरशी तयार होते. या किडीमुळे पाने आकसतात व बारीक होतात.

मावा

तुडतुडे

पानाच्या खालच्या बाजूस बहुसंख्येने आढळतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे कडा पिवळसर व नंतर ताबूस होता.जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने गळून पडतात व झाडांची वाढ खुटंते.

तुडतुडे

फुलकिडे :

फुलकिडे

ही कीड फिक्कट पिवळसर रंगाची असून अत्यंत बारीक असते. त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ असतात. सर्वसाधारणपणे ही कीड पानाच्या मागच्या बाजूने पापुद्रा खरवडून अन्नरस शोषण करते. त्यामुळे पाने निस्तेज होतात व तपकिरी दिसू लागतात.

 

 

 

पांढरी माशी :

पांढरी माशी १ ते २ मि.मि. लांब, रंगाने पिवळसर, पांढरट असून पंख पांढरे किंवा करडया रंगाचे असतात. या किडीची पिल्ले, प्रौढ पानाच्या खालच्या भागात राहून रस शोषण करतात. त्यामुळे पाने कोमजतात व मलूल होतात.

 

 

पिठया ढेकूण :

या किडीची पिल्ले आणि प्रौढ लहान, चपटी व दिर्घ वर्तुळाकार असतात. शरीराभोवती मेणासरखा पांढ-या रेंशमी कापसासारखे आवरण असते. पिठया ढेकणाची पिल्ले व प्रौढ या दोन्ही अवस्था कापसाची पाने, कोवळी शेंडे, पात्या, फुले व बोंडे यातून रस शोषण करतात. त्यामुळे ते सुरुवातीला सुकतात व नंतर वाळून जातात. हे ढेकूण आपलया शरीरातून साखरेसारखा गोड द्रव बाहेर टाकतात. त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा होऊन झाडाची वाढ खुंटते व त्यामुळे उत्पादनात घट होते.

पिठया ढेकूण
पिठया ढेकूण

कपाशीवरील बोंड अळया

ठिंपक्याची बोंडअळी :

या किडींची अळी गर्द तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळे, बदामी ठिंपके असतात व शरीराच्या मधोमध पांढुरका पटटा असतो. कपाशीच्या पेरणीनंतर एक महिन्याने अळी प्रथम झाडाच्या शेंडयात शिरुन आतील भाग खाते, त्यामुळे शेंडे सुकतात. नंतर अळी कळयात व बोंडे गळून पडतात व शिल्‍लक राहिलेली व किडलेली बोंडे लवकर फुफ्तात, त्यामुळे हलक्या प्रतीचा कापूस मिळतो.

 

अमेरिकन / हिरवी बोंडअळी :

अमेरिकन अळीची अंडी चकचकीत गोल घुमटाच्या आकाराची किंवा खसखसीप्रमाणे असून हिरवट पिवळया रंगाची असतात. लहान अळया पारदर्शी, पिवळसर पांढ-या रंगाच्या किंवा हिरवफ् असतात. मोठी अळी ३५ ते ५० मि.मी. लांब, पोपटी किंवा हिरवट रंगाची असून कडेवर व पाठीवर तुपकट गर्द करडया उभ्या रेषा असतात. अळया अंडयातून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीस कोवळी पाने, कळया, फुले यावर उपजिविका करतात. बोंडे आल्यानंतर त्यामध्ये तोंड खुपसून आतील भाग खातात. त्यामुळे लहान बोंडे, पात्या, फुले, कळया गळून पडतात किंवा झाडावरच पावसाच्या पाण्यामुळे सडतात.

गुलाबी बोडअळी :

या बोंडअळीची अंडी लांबट पण चपटी असून प्रथम रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात. अंडयातून बाहेर आलेली अळी पांढुरकी तर पूर्ण वाढ झालेली अळी शेंदरी रंगाची असून डोके गडद बदामी रंगाचे असते. ही कीड पात्या, फुले व बोंडाना उपद्रव करते. प्रादुर्भाव फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी सारखी दिसतात. अळी रुईमध्ये छिद्रे करुन सरकी खाते. प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे परिपक्व न होताच फुटतात.

गुलाबी बोडअळी

इतर किडी :

 पाने खाणारी अळी :

ही कीड विविध पिकावर जगणारी असून केव्हातरी पण मोठया प्रमाणात येते. सुरुवातीच्या काळात अळया समुहाने राहून पानाच्या मागील हिरवा भाग खरवडून खातात. नंतर एकएकटया राहून संपूर्ण पाने खातात. फक्त मुख्या शिरा व उपशीरा तेवढयाच शिल्लक ठेवतात. ही अळी फुले, कळया व बोंडावर सुध्दा प्रादुर्भाव करून खूप नुकसान करतात.

पाने खाणारी अळी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

तांबडे ढेकूण :

ही कीड वर्षभर कार्यक्षम असते, पण सप्टेंबर ऑक्टोंबर मध्ये अधिक कार्यरत असते. प्रौढ ढेकूण व पिल्ले सुरुवातीला पानातील, कोवळया शेंडयातून रस शोषण करतात. पक्व बोंड आणि उमलेल्या बोंडावर बहुसंख्येने राहून सरकीतील रस शोषण करतात.

तांबडे ढेकूण

करडे ढेकूण:

ही कीड नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कार्यक्षम असते. प्रौढ व पिल्ले अर्धवट उमललेल्या बोंडातील, सरकीतील रस शोषून घेतात. त्यामुळे तेलाचे प्रमाण कमी होते व बियाण्याची प्रत घसरते. यंत्रामधून सरकी काढताना ही ढेकणे चिरडून रुईवर डाग पडतात.

करडे ढेकूण

लाल कोळी :

लाल कोळी किटकाच्या तुलनेने वेगळे असतात. त्यांना आठ पाये असतात. पिल्ले व प्रौढ कोळी कोवळया पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पानावर फिकट पांढरट पिवळे चट्टे पडतात, नंतर पाने तपकिरी होऊन वाळतात. सध्या लाल कोळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळून येत आहे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

· बीजप्रक्रिया : बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास इमिडाक्लोप्रीड किंवा थायामिथॉक्झाम ७० डब्ल्यू.एस. ५-७ ग्रॅम प्रति किलो बियाणे बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे सुरुवातीला १५ ते २० दिवस रस शोषण करणा्यया किडीपासून संरक्षण मिळते.
· रोग व रस शोषण कीड यांना प्रतिकारक्षम किंवा सहनशील वाणांची लागवड करावी.
· मित्रकिटकांना हानीकारक किटकनाशकांची फवारणी टाळावी.
· पांढ-या माशीकरीता पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत.
· शेंदरी बोंडअळीसाठी पीक १२० ते १३० दिवसाचे झाल्यावर उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामाटॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीच्या अंडयाचे कार्ड (१.५ लाख अंडी / हे.) पिकावर लावावेत.

कपाशीच्या विविध टप्प्यानुसार फवारणीसाठी कीटकनाशके

कालावधी कीड कीटकनाशक प्रमाण१० लिपाणी 

साध्या फवारणी यंत्राने

०-४० मावा, तुडतुडे, पिठया ढेकूण ॲसिफेट ७५ एसपी किंवा २० ग्रॅम
फोरेट १० जी किंवा १० कि./हे.
निंबोळी अर्क किंवा ५ टक्के
निंबोळी तेल ५० मि.ली.
४०-६० तुडतुडे, फुलकिडे, पिठया ढेकूण व्हर्टीसिलीयम लिकॅनी किंवा ४० ग्रॅम
थायामिथॉक्झाम २५ डब्ल्यूजी

किंवा

२.५ ग्रॅम
ॲसिटामिप्रीड २० एसपी किंवा २ ग्रॅम
फ्लोनिकॅमीड ५० टक्के डब्ल्यु जी ३ ग्रॅम
तंबाखुवरील पाने

खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)

नोमोरिया रिलाई ४० ग्रॅम
६०-८० फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी फिप्रोनील ५ एससी किंवा २० मि.ली.
क्लोथिनियाडीन ५० डब्ल्युडीजी किंवा १ ग्रॅम
फ्लोनिकॅमीड ५० टक्के डब्ल्यु जी ३ ग्रॅम
८०-१०० फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे, पिठया ढेकूण निंबोळी अर्क किंवा ५ टक्के
निंबोळी तेल किंवा ५० मि.ली.
अझाडिरॅक्टीन ३००० पीपीएम किंवा २५ मि.ली.
अझाडिरॅक्टीन १०००० पीपीएम किंवा १० मि.ली.
बुप्रोफेझीन २५ एससी किंवा २० मि.ली.
डायफेनथ्युरॉन ५० डब्ल्यूपी किंवा १२ ग्रॅम
फ्लोनिकॅमीड ५० टक्के डब्ल्यु जी ३ ग्रॅम
१०० पुढे पांढरी माशी, तुडतुडे, पिठया ढेकूण ॲसिफेट ७५ टक्के  किंवा २० ग्रॅम
ट्रायझोफॉस ४० ईसी २० मि.ली.
शेंदरी बोंडअळी थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी किंवा २० ग्रॅम
लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी १० मि.ली.

(पेट्रोल पंपासाठी किटकनाशकाचे प्रमाण तीन पट वापरावे)

सौजन्‍य- किटकशास्‍त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

 

Exit mobile version