Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

फेसबुकवरील ‘या’ उत्सुकतेपोटी तुमचा डेटा होतोय चोरी

जाणून घ्या ….तुम्ही कोणत्या हिरोसारखे दिसतात, तुमच्यावर कोण प्रेम करतेय, मागील जन्मी कोण होता, पुढचा जन्म कोठे होईल, तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल, तुमचा मृत्य कधी होईल , कोण तुमच्यावर चोरून प्रेम करतेय यासारखे प्रश्‍न विचारून तुम्हाची विनोदी उत्सुकता वाढवून तुमची माहिती फेसबुकच्या माध्यमातून चोरली जात आहे.

फेसबुकवरील सुमारे ५ कोटी युजर्सची सर्व माहिती एका खासगी कंपनीपर्यत पोहचली आहे. त्यामुळे सावध रहा असा सल्ला देण्यात आला आहे.

असा होतो डेटा चोरी

फेसबुकवर एक पोस्ट येते त्यात जाणून घ्या तुमच्यावर कोण प्रेम करतेय, तुम्ही कोणत्या हिरोसारखे दिसतात, मागील जन्मी कोण होता, तुमचा लाईफ पार्टनर कोण आहे / होणार आहे, कोण तुमच्यासोबम डेटला येण्यास तयार आहे, रीड अ समरी युवर लाईफ, विच बॉलिवुड कॅरेक्टर आर यु यारख्या पोस्ट येत आहेत.

युजर्स प्रथम यात भाग झेत नाही. पंरतू मित्राने केले आहे, ते गमतीशीर आहे असे बघुन तेही सहज ट्राय करावा म्हणून भाग घेतात. जेव्हा या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुमचा डेटा त्या लिंकवर शेअर होतो. काही वेळात विचारलेल्या प्रश्‍नावर तुम्हाला गमतीशीर उत्तरे येतात.

युजर्स गंमत म्हणून ते फेसबुकवर पोस्ट करत असतात. तर त्यांचे मित्र त्यावर कमेटही टाकत असतात. या सर्व कमेट पाहून लाईक पाहून इतरही त्यात सहभागी होतात.

असा करा डेटा सुरक्षित

फेसबुकवरील आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी युजर्सने फेसबुक सेटिंग्जमधील प्रायव्हसीमध्ये जावे, तेथे डिफॉल्ट सेटींग्जला जात एव्हरीवन हा पर्याय एडिट करून केवळ फे्रंडस सिलेक्ट करून सेव्ह करा. यामुळे तुमचा डेटा केवळ तुमचेच मित्र पाहू शकतील.

ही घ्या काळजी

फेसबुकवर किंवा अन्य कोणत्याही सोशल मिडीयावर आयोजित प्रश्‍न मंजुषा, किंवा जाणून घ्या, गंमतीशीर स्पर्धा यात उत्सुकतेपोटी भाग घेवू नका. अनोळखी फे्रेंडस रिक्कवेस्ट स्विकारू नका.

Exit mobile version