मान तजेलदार करण्यासाठी टिप्सः

वय वाढत जाते तेव्हा त्याच्या खुणा केवळ चेहरा आणि हातांवरच दिसत नाहीत, तर तुमच्या मानेवरही दिसायला लागतात. त्यामुळे मानेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरच्या घरी आपण काही उपाय करू शकतो. त्यासाठी येथे दिलेल्या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात.

सुंदर चेहऱ्याबरोबर मानही आकर्षक दिसली पाहिजे, तरच लूक व्यवस्थित दिसतो. मान तजेलदार करण्यासाठी खालील टिप्सः-

१. मानेला रात्री मसाज कराः
मानेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी अँटी-एजिंग सीरम वापरा. रात्री सीरमने मानेला मसाज करा. रेटिनॉल, व्हिटॅमिन-सी किंवा नियासिनगाइड हे चांगले अँटी-एजिंग सीरम आहेत, ते तुमच्या मानेवरील त्वचेला रात्रभर टवटवीत करण्यात मदत करू शकतात. रात्री मसाज केल्यामुळे रात्रभर त्वचेमध्ये क्रीम व्यवस्थित मुरते. तुमच्या नाईट केअर रूटीनमध्ये मानेच्या मसाजचा समावेश करा. हे लागू करून तुम्ही मानेची त्वचा सुरकुत्यामुक्त करू शकता.

२. सनस्क्रीनः
सनस्क्रीन केवळ चेहऱ्यावरच नाही, तर मानेलाही लावा. नेहमी चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन खरेदी करा. हे सनस्क्रीन आपल्या त्वचेला सुरकुत्या, टॅनिंग, उन्हाचे डाग दूर ठेवते. हे लोशन मानेच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लावा.

३. नारळाचे किंवा बदाम तेल लावाः
तुमच्या दिनचर्येत मानेच्या मसाजचा समावेश केल्याची खात्री करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा मानेला तेलाने मसाज करा. नारळ आणि बदाम तेलाने मसाज करा. तेल लावल्यानंतर हाताने वरच्या दिशेने मसाज करा, यामुळे तुमची मान मऊ राहील. उन्हामुळे मान काळी पडली असेल तर पुदिन्याचे तेल त्याचा रंग उजळवण्यास मदत करते. हे तेल मज्जातंतूंना आराम देते.