सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दोन ग्लासतरी पाणी प्यायला हवे असे अनेकदा सांगितले जाते. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे दुप्पट होतात असे म्हटले जाते. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री पाणी पिऊन झोपल्याने हे फायदे होतात. आपणही आजपासून हे करून बघाच..
1) झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने शरीरातील घाण, विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला नेहमी ताजेतवाने, टवटवीत वाटते. पेशींना तारुण्य, टवटवी मिळते. परिणामी त्वचा तजेलदार, फ्रेश दिसण्यास मदत होते.
2) रात्री पाणी प्यायल्याने हॉर्मोन आणि ऊर्जेचा बॅलन्स साधला जातो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि चांगली झोप येते.
3) झोपण्यापूर्वी पाणी पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरित्या होतो आणि हृदयविकारासारख्या समस्यांपासून बचाव करता येतो.
4) झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिझम सुधारते.