तुमच्या मुलांना सक्षम करायचे आहे? मग ही कौशल्ये बालपणीच शिकवा

काही गोष्टी अशा आहेत ज्या मुलांना लहानपणीच शिकवाव्यात. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या गरजेच्या आहेत.

१) पोहणे-

सगळ्यांना पाण्यात खेळायला आवडते. शाळा, कॉलेज किंवा अनेक सहली बीच वर जातात. पण त्यासाठी पोहायला येणे आवश्यक आहे. तुमच्या मुलांना पोहायला येत का ? त्यांना अगदी लहान वयातच पोहायला शिकवा. जेणेकरून त्यांना पोहोण्याचा मनमुराद आनंद  लुटता येईल . स्वरक्षण यासाठी देखील पोहायला येणे आवश्यक आहे. मग पाणी कितीही खोल असले तरीही पोहता यायला हवे.

२) सायकल शिकवणे –

लहान मुलांना सायकल शिकवा. सुरवातीला थोडीशी भीती वाटेल पण हळूहळू सवय होईल. हा आयुष्याचा एक भाग आहे आणि त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. दोन चाकांवर गाडी चालवणे  हे लहान वयात सहज शक्य असते. थोडे मोठे झाल्यावर हे कठीण होते. सायकल चालवल्याशिवाय टु व्हीलर लवकर येत नाही. मुलांना आधी सायकल शिकवा .

३) कुकिंग-

तुम्हाला हे नक्कीच आवडणार नाही की  मुलं आगीजवळ किंवा कोणत्या गरम वस्तूजवळ जायला पाहिजे.  पण जरा तर्कबुद्धीने विचार करा. अशा वेळेस मुलांनी काय करावे जेव्हा मुलांना खूप भूक लागली आहे, फ्रीज मध्ये काहीही नाही आणि तुमची कामवालीही आली नसेल?त्यामुळे त्यांना शिकवा. चीज सॅंडविच ,केळीचं शिकरण, दूध पोहे असे पदार्थ ज्यामुळे त्यांची भूक भागेल आणि त्यांना आपण काही बनवल्याची मजाही वाटेल. मुलांना स्वावलंबी करण्याचे हे पहिले पाऊल.

4 ) कला –

मुलं लहानपणासून कोणत्या ना कोणत्या कलेत हुशार असतात. त्यांच्या या अंगीभूत गुणांना प्रोत्साहन द्या. कला माणसाला आयुष्य जगण्याची नवी उमेद देते. नवा उत्साह मिळतो. म्हणून कलांची जपणूक करा.

5 ) खेळ –

खेळामुळे माणूस सुदृढ होतो. एकाग्रता वाढते. खिलाडू वृत्ती रुजते. हल्लीच्या इलेक्ट्रॉनिक विश्वात खेळ म्हणजे मन प्रसन्न करण्याचे एक उत्तम माध्यम.