Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पिंपळी – एक गुणकारी उपाय

पिंपळीच्या झाडाच्या मूळाचा वापर पिंपळमूळ या नावाने होत. हे अत्यंत तिखट अर्थात चव घेतल्यास जिभेच्या शेंड्याची, नाकाची चुणचुण करणारी, प्रसंगी घाम आणणारी असते.

तिखट असूनही पिंपळमुळास एक सुगंध असतो. त्यामुळे पिंपळगुळाची उपयुक्तता मानसिक विकार, मतिमंदता, कफामुळे आलेले.

हृदयविकार यांमध्ये दिसून येते. अतिशय तिखट असल्यामुळे पचनशक्ती वाढविणारे, साठून राहिलेली आव, पाचन करणारे, वाढलेल्या कफामुळे चोंदलेले नाक, जाड झालेल्या रक्तवाहिन्या, आतड्यांत बसलेला कफाचा लपेटा, डोकेदुखी, यकृताचा मार्ग बंद झाल्यामुळे झालेली कावीळ अशा सर्व विकारांत पिंपळगुळाचा उपयोग होतो.

मतिमंद मुलांमध्ये बऱ्याच वेळा सर्दी, लाळ गळणे, बोबडे बोलणे, अजिबात न बोलणे, सारखी लघवी होणे अशी लक्षणे असता पाव चमचा पिंपळगुळ व चिमूटभर वेखंड मधातून चाटवल्यास बालकाची कफ होण्याची प्रवृत्ती क्रमाने कमी होत मागे पडलेले बोलणे सुरू होऊ शकते.

मध व पिंपळीने चरबी कमी होते . दात दुखणे, हालणे, ठणका लागणे इत्यादीसाठी पिंपळी, जिरे, व सैंधव यांचे वस्त्रगाळ चूर्ण करुन दांताच्या मुळाशी घासल्याने त्या तक्रारी कमी होतात. शरीरात स्थूलता फार वाढली असेल तर पिंपळीचे चूर्ण सतत काही दिवस मधाबरोबर घेतल्याने शरीरातील चरबी कमी होते व त्यापासून होणारा रोग बरे होतात.

Exit mobile version