Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

“..भारूडाचे गारूड सातासमुद्रापार पोहोचवणारा सच्चा लोककलावंत”

भारूडकार निरंजन भाकरे यांना श्रद्धांजली

महाराष्ट्राच्या भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा लोककलावंतास आपण मुकलो आहोत, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ भारूडकार निरंजन भाकरे यांना निधनाबद्दल वाहिली आहे.

भारूड या लोककलेला बुरगुंडाकार निरंजन भाकरे यांनी आपल्या सादरीकरणाच्या आगळेपणातून सातासमुद्रापार पोहोचवले, त्याचे गारूडच रसिक प्रेक्षकांवर घातले. त्यांच्या बुरगुंडाने समाजातील अनेक घडामोडींवर मार्मिक असे भाष्य केले. भारूडातून समाजप्रबोधन करताना त्यांची तिरकस, बोचरी शैली विशेष ठरली. लोककला क्षेत्र आणि लोककलावंत याबाबतही त्यांनी परखड भूमिका ठेवली. भारूडाचे गारूड सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या महाराष्ट्राचे थोर लोककलावंत निरंजन भाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Exit mobile version