अफाट यश उद्योगपतीची ही गोष्ट तुम्हालाही प्रेरणा देईल !

कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते, हे आपण जाणून  आहोत. लहान कामातूनच मोठे काम, ध्येय साध्य करता येणे शक्य आहे, हे स्पेनच्या प्रसिद्ध वस्त्रोद्योग कंपनी इंडिटेक्सचे सर्वेसर्वा अमेसिंया ओर्टेगा यांनी करून दाखवले. एकेकाळी उधारीवर जीवन जगलेल्या ओर्टेगा कुटुंबीयांनी आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर स्पेनमध्ये शेकडो कामगारांच्या हाताला काम दिले आहे. घराला हातभार लावण्यासाठी शिक्षणावर पाणी सोडलेल्या अमेसिंया यांनी स्पेनमध्ये सर्वात मोठी वस्त्रोद्योग कंपनी उभारण्याची किमया साधली. त्यांचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटातील कहाणीला शोभणारा असा आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी केवळ परिश्रम आणि परिश्रमच केले आहेत. आजही वयाच्या 80 व्या वर्षीही न थकता कंपनीत जातात आणि सहकार्‍यांशी हितगूज करतात.

जगात कपड्यांची नवीन फॅशन विकसित करण्याचे श्रेय या कंपनीकडे जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार फॅशन आणण्याचे कसब ओर्टेगा यांनी साधले हे विशेष.

अमेंसिया ओर्टेगा यांचे वडिल रेल्वेत नोकरी करत होते, तर आई गृहिणी. एक दिवस त्यांची आई एका दुकानदाराकडून उधारीवर सामान आणण्यासाठी गेली. मात्र दुकानदाराने त्यांच्या आईचा अपमान केला आणि सामान न देताच परत पाठवले. या घटनेचा अमेंसियांवर सखोल परिणाम झाला.

घरातील आर्थिक चणचण दूर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परिणामी पैसा कमावण्यासाठी वयाच्या चौदाव्या वर्षी शिक्षण सोडले. अनेक वर्षे त्यांनी लहानसहान काम केले आणि कोणतेच काम लहान किंवा मोठे नसते, हे आपण जाणून आहोत. लहान कामातूनच मोठे काम, ध्येय साध्य करता येणे शक्य आहे, हे स्पेनच्या प्रसिद्ध वस्त्रोद्योग कंपनी इंडिटेक्सचे सर्वेसर्वा अमेसिंया ओर्टेगा यांनी करून दाखवले.

एकेकाळी उधारीवर जीवन जगलेल्या ओर्टेगा कुटुंबीयांनी आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर स्पेनमध्ये शेकडो कामगारांच्या हाताला काम दिले आहे. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न केला. 1975 मध्ये त्यांनी इंडिटेक्स नावाची वस्त्रोद्योग कंपनी सुरू केली. प्रसिद्ध स्पॅनिश ब्रँड इंडिटेक्सची ही पायाभरणी होती.

आज सुमारे 100 देशात 7 हजार स्टोअर्समध्ये इंडिटेक्सच्या झारा ब्रँडचे कपडे मिळतात. ओर्टेगा यांनी प्रत्येक वेळी नवीन फॅशनेबल कपडे शहरात प्रथमच आणण्याचा मान मिळवला. अन्य कंपन्यांच्या तुलनेत इंडिटेक्सची फॅशन अगोदर बाजारात यायची.

आठवड्यात दोनदा कपड्याचा स्टॉकमध्ये ते बदल करत असत. फॅशन विक दरम्यान सादर होणारे डिझाईन, कपडे हे काही महिन्यानंतर बाजारात दाखल व्हायचे. मात्र ओर्टेगा यांनी काही आठवड्यातच ते कपडे बाजारात आणले.

त्यांच्यासाठी दोन गोष्टी नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. लोकांना कोणती नवीन फॅशन हवी आहे हे ते ग्राहकांकडून जाणून घेत आणि त्यानुसार कृती करत.

दुसरीकडे स्वस्तात फॅशन करण्यासाठी चीनकडून माल मागवला जायचा. असे असताना स्पेन, पोर्तुगाल, मोरेक्कोतून ओर्टेगा कपडा मागवायचे. ते आपल्या कारखान्यातून या कपड्याचे कटिंग, सिलाई करत. स्थानिक टेलरच्या मदतीने विविध डिझाइन आकारास आणले जायचे. चीनच्या स्वस्त कपड्यांचा मुकाबला करण्यासाठी इंडिटेक्सने दजेदार कपड्यांची साखळी बाजारात आणली.

परिणामी चीनपेक्षा इंडिटेक्सच्या कपड्यांना मागणी वाढली. यासाठी त्यांनी पुरवठा साखळीवर देखील लक्षठेवले. स्टोअरमध्ये सर्व स्टॉक कसा विकला जाईल याकडे त्यांनी लक्ष दिले. स्टोअरमध्ये कपडे पडून राहणार नाहीत, यासाठी त्यांनी मार्केटिंग जोरात केली. अधिकाधिक मालाची साठवणूक करण्यापेक्षा ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार ते कपड्याची ऑर्डर द्यायचे आणि तातडीने त्याचा पुरवठा कसा करता येईल, याबाबत सजग असायचे.

ओर्टेगा यांचे वय आज 80 असले तरी ते नव्या फॅशनबाबत तितकेच जागरुक आहेत आणि त्यात ते रुची घेऊन लोकांच्या पसंतीनुसार फॅशन बाजारात आणतात. 2012 रोजी त्यांनी इंडिटेक्सच्या अध्यक्षपदापासून स्वत:ला बाजूला केले. कंपनीत त्यांच्यासाठी कधीही वेगळी कॅबिन नव्हती.

परिश्रमाबरोबरच विनम्रतेनेदेखील यश मिळते, असे त्यांना वाटते. आपल्या यशाने कोणीही हुरळून जावू नये आणि अहंकार मनात निर्माण होऊ नये, असे ते म्हणतात. कोणत्याही उद्योगात ग्राहक संतुष्ट असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. परिश्रम आणि नम्रताबरोबरच ग्राहकांचे समाधान करण्याची कला देखील अवगत असणे गरजेचे आहे. तरच यशाची फळे चाखता येतात, असे ओर्टेगा म्हणतात.