तुम्ही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरत असाल तर १ ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा. कारण या तारखेपासून तुमच्या बँकिंग व्यवहारांबाबत नवीन नियम लागू होणार आहे. नवीन नियम माहीत करून घेतला नाही तर तुम्हाला नाहक भुर्दंड पडू शकतो.बँकिंग व्यवहारांच्या नवीन नियमानुसार, जर तुम्ही तुमच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे कोणत्याही प्रीमियम, बिल किंवा इतर पेमेंटसाठी ऑटो डेबिटची सुविधा सक्रिय केली असेल, तर रक्कम कापण्यापूर्वी बँकेला तुमची संमती घ्यावी लागेल. बँका केवळ स्टँडिंग इन्स्ट्रक्शनच्या आधारे तुमच्या खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र कोविडमुळे अनेक बँका त्यांच्या प्रणाली सुधारू शकल्या नाहीत. त्यानंतर हा नियम लागून करण्यास ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. आरबीआयच्या या नवीन नियमानुसार, बँका ५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेसाठी ग्राहकांची संमती घेतील. बँकेला ऑटो डेबिटच्या २४ तास आधी ग्राहकाला सूचना पाठवावी लागेल आणि ग्राहकांची परवानगी घ्यावी लागेल. ही सूचना ग्राहकांना एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या नव्या नियमामुळे आता थोडासा व्यापारी आणि बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला थोडासा मनस्थाप होणार असला तरी यामुळे मोबाईल फोन हॅकिंगद्वारे किंवा बोगस तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांची होणारी लुट थांबण्यास मदत होणार असल्याचा आशा तरी सध्या रिझर्व्ह बँकेकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे हॅकिंग माध्यमातून बॅक ग्राहकांच्या खात्यावर डल्ला मारणाऱ्या काही प्रमाणात पायबंद घालण्यात यशस्वी होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी आता ग्राहकाला २४ तास आधी सूचना पाठविल्याने ग्राहकाने मंजूरी दिली तरच बँक खात्यातून पैशांचे हस्तांतरण होणार आहे. ही नवी नियमावली सध्या जरी डोकेखाऊ आणि वेळखाऊ वाटत असली तरी त्याचा फायदा ग्राहकांनाच होणार असल्याचे दिसून येत आहे.