व्हेज पुलावचे आहेत विविध प्रकार

भारतामध्ये पुलाव या पदार्थाला अढळ स्थान आहे. रोज रोज भात खाऊन कंटाळा आला. मग पुलाव केला की मस्त जेवण होत , शिवाय घरी कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट होणार पदार्थ. सगळ्यांना आवडणारा पदार्थ आणि मुळात म्हणजे रुचकर पदार्थ म्हणजे पुलाव.
भारतात हे भाताचे प्रकार प्रसिद्ध आहेत. एखादा दिवस भात नाही खाल्ला तर पोट भरल्यासारखे वाटत नाही. लंच असो व डिनर कुठेही हा पदार्थ साजेसा आहे. फक्त यासाठी अट इतकीच की बासमती तांदूळ असावा म्हणजे भाताचे शीत दाणेदार दिसते आणि फुललेले दिसते. पुलाव या पदार्थाला कोणतेही बंधन नाही कारण हा पदार्थ व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारांमध्ये स्वतंत्र बनवता येतो. फक्त खास मसाले त्यामध्ये हवे.
विविध प्रकारचे पुलाव आहेत, जे आपल्याला माहीतच नसतात. असेच खास प्रकार खास तुमच्यासाठी

1 ) गोड केशर पुलाव –
हा पुलाव गोडसरच असतो. गोड खाणाऱ्या व्यक्तींना हा नक्की आवडेल. साजूक तूप, सुकामेवा आणि केशराचा यामध्ये वापर करतात.
2 ) काबुली पुलाव –
जर तुम्ही व्हेज खाणारे असाल तर यामध्ये काजू , गाजर घालू शकता आणि नॉन व्हेज खाणारे असाल तर मटण पीस घालू शकता.
3 ) आचारी पुलाव –
आचारी पुलावची खासियत याचे मसाले आहेत. मसाला घालून हा पुलाव तयार केला जातो. लग्नकार्यात हा पुलाव वाढला जातो. याला मसाले भात म्हणूनही ओळख आहे.
4 ) शाही पुलाव –
सहजतेने कुठेही मिळणार पुलाव , जो अतिशय रुचकर असतो. शिवाय यासोबत पनीरची कोणतीही भाजी छान लागते.
5 ) कांदा पुलाव –
नावावरूनच लक्षात येत की यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा असतो आणि कांद्यामुळेच याला चव येते.
6 ) चणा पुलाव –
व्हेज खाणाऱ्या लोकांची ही एक अर्थाने व्हेज बिर्याणी असते. काबुली चणे यामध्ये वापरतात.
7 ) दही पुलाव –
दक्षिणेत हा पुलाव अधिक प्रमाणात बनवला जातो. पण यात फक्त दही नसते तर त्याचसोबत दूध आणि इतर भाज्यांचा देखील समावेश असतो.
8) काश्मिरी पुलाव :
हा पुलाव गोड असतो. त्यात प्रामुख्याने काश्मीरचे वैशिष्ट्य असलेले फळ – सफरचंदाचा समावेश असतो. तसेच त्यात बेदाणे आणि सुकामेवाही असतो. दुध आणि मलई याचा वापर या पुलावात केला जातो.