बाळंतपणाच्या कळा सुरु असलेल्या महिलेले तातडीने कुठल्यातरी वाहनाने सुरक्षीतपणे प्रसूतीसाठी सूतिकागृहात दाखल केले जाते, त्यात जर संबंधित महिला खासदार असेल तर तिची कितीतरी काळजी घेतली जाईल. पण न्यूझीलंड मध्ये भलतेच घडले आहे. येथील खासदार ज्युली अॅन जेंटर यांना रात्री दोन वाजता प्रसूती कळा सुरु झाल्या. यानंतर त्यांनी काय करावे, तर सरळ सायकल उचलली आणि पायडल मारत हॉस्पिटल गाठले. सुमारे तासाभरानंतर तिने मुलाला जन्म दिला. खासदार ज्युली अॅन जेंटर यांची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जेंटर यांनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहिले?
ही घटना मागच्या शनिवारची आहे. खासदार ज्युली अॅन जेंटर यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या. यानंतर त्यांनी सायकलवरून हॉस्पिटल गाठले. सुमारे तासाभरानंतर मुलाला जन्म दिला. त्यांनी लिहिले, मोठी बातमी! पहाटे ३.०४ वाजता आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात नवीन सदस्याचे स्वागत केले. मी खरोखरच सायकल चालवण्याचा विचार करत होतो, पण शेवटी ते खरे ठरले. दवाखान्यात जायला 2 वाजता निघालो तेव्हा फारशी अडचण नव्हती. पण काही वेळाने वेदना तीव्र झाल्या. त्यानंतर 2 ते 3 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 10 मिनिटे लागली. माझ्या पोटात एक निरोगी बाळ झोपले आहे हे आम्हाला माहीत होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर लवकरच मी तेथील डॉक्टरांच्या उपस्थितीत बाळाला जन्म दिला.
सायकल चालवणे फायदेशीर
जेंटर यांच्या पोस्टचे नेटकऱ्यांनी खूप कौतुक केले. लोकांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर लोकांनी सांगितले की, प्रसूतीदरम्यान सायकल चालवणे अधिक फायदेशीर ठरले. सायकलवरून मुलाला जन्म देण्यासाठी जेंटर हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. तीन वर्षांपूर्वीही त्यांनी सायकलवरून ऑकलंड हॉस्पिटल गाठले –होते आणि मुलाला जन्म दिला होता. सायकल चालविणे त्यांना आवडते.