सेल्फी काढल्याने होतो सेल्फायटिस

चेहऱ्यावरील हावभाव बदलत, तोंडाचा चंबू अर्थात पाउट करत, करत तुम्ही दिवसातून 3 पेक्षा अधिक सेल्फी काढत असाल तर सावधान!

हे मानसिक आजाराचे लक्षण असू शकते. या आजाराला ‘सेल्फायटिस’ असे म्हणतात.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सेल्फी काढण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लंडनमधील नॉटिंगहॅम ट्रेट विद्यापीठाने आणि तामिळनाडूतील त्यागराज स्कूल ऑफ मॅनेजमेंटने केलेल्या संशोधन अहवालात त्यांनी हे मांडले आहे.

‘या आजाराबद्दल सखोल अभ्यास करण्यासाठी आम्ही जगातील पहिली ‘सेल्फायटिस बिहेवियर स्केल’ तयार केली आहे’ अशी माहिती नॉटिंगहॅम विद्यापीठातील मार्क ग्रिफिथ यांनी दिली आहे.

सतत सेल्फी घेण्याची इच्छा एखाद्या व्यसनाप्रमाणे असते, असेही त्यांचे म्हणणे आहे.