सध्याच्या धावपळीच्या जीवन शैलीमुळे मेंदूवरही ताण ये असतो. ज्यामुळे तुमच्या मेंदूवर अतिरिक्त ताण पडतो आणि मानसिक रित्या आपण कमकुवत होतो , त्यापासून स्वतःला वाचवले पाहिजे. त्या बद्दल माहिती आपण घेणार आहोत.
१ ) मेंदूचा अधिक वापर –
जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हाला डॉक्टर सल्ला देतात की पूर्ण आराम करा . जरी तुम्हाला अगदी खूप बर वाटत असेल तरीही .कारण हेच की आजारी असताना मेंदू हा इतर दिवसांपेक्षा जास्त कार्यरत असतो . मेंदू शरीराच्या सगळ्या भागांना नियंत्रित करतोच पण याशिवाय आजारांशी लढायची आणि याच दुप्पट कामासाठी मेंदूला आरामाची जास्त गरज असते. आजारी असताना जर आराम नाही केला तर ते जास्त अपायकारक ठरू शकते .
२) सकाळी नाश्ता न करणे –
जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल किंवा खूप उशिरा करता असाल तर तुमच्या मेंदूच्या वाढीसाठी उपयुक्त तत्वे मिळण्यास तुम्हाला उशीर होतो . जर तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी थांबव लागत असेल तर तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि तुम्ही मानासिकरित्या अशक्त होता . नाश्ता नेहमी वेळेवर आणि नियमित करावा .
३ ) गरजेपेक्षा जास्त खाणे – (ओवर ईटिंग) –
बरेचदा लोकांमध्ये ही समस्या आढळते की एकदा खाणे विसरले नंतर दुप्पट खातात .पण हा योग्य मार्ग नाही . जर तुम्ही जास्त खात असाल तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या मेंदूवर होतो .त्यामुळे मेंदूच्या कामात अडथळे निर्माण होतात . कारण तुम्ही जेव्हा ज्या पद्धतीच अन्न खाल्ल्या जाईल तेव्हा त्याप्रमाणात तुमच्या मेंदूत इन्सुलिन निर्माण होत असते , त्या खाण्याला पचवण्यासाठी . जर दर वेळी खाण्यचे प्रमाण जास्त असेल तर वजन वाढण्याची शक्यता असते शिवाय मधुमेहाचा धोका संभवतो. यामुळे तुमचे शरीर व मेंदू दोन्ही अस्थिर होतात . त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाऊ नये . आहाराच्या नियमांचे पालन करावे .
४ ) डीहाईड्रेशन –
शरीरात सगळ्यात जास्त पाणी असते आणि जेव्हा आपण खूप वेळपर्यंत बसून राहतो किंवा जास्त पाणी पीत नाही तेव्हा पेशींचे आकुंचन होते . त्यामुळे शरीराला पाणी मिळत नाही आणि तेच पाणी मेंदूकडून घेतले जाते . याच कारणामुळे माणूस मानसिक रित्या शक्तिशाली बनत नाही . त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. दिवसातून खूप वेळा पाणी प्यावे .
५) गोड पदार्थ जास्त खाणे –
खूप शोधानंतर हे कळले की आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त वेळ असेल तर भ्रमिष्टपणा येतो किंवा शिकायच्या स्थितीवरही वाईट परिणाम होतो .
६) झोपताना चेहऱ्यावर पांघरूण घेऊन झोपणे –
– जेव्हा तुम्ही झोपताना चेहऱ्यावर चादर घेऊन झोपता तेव्हा तुमच्या मेंदूला होणारी ताज्या हवेला तुम्ही थांबवत असता आणि त्यावेळी कार्बन-डाई-आक्साइडजास्त असतो . याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. अजून अस कळल की यासारख्या सवयींमुळे डोकेदुखी आणि अत्यंत घटक असे वेडेपण उद्भवू शकते .
७ ) ताणतणाव –
आपल्याला सगळ्याचं माहित आहे की ताणतणाव शरीरासाठी अजिबात चांगला नाही. यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान मेंदूचे होते . जेव्हा तुम्ही तणावग्रस्त असता तेव्हा कार्टिसोल हे रसायन तयार होत असते . पण याचे प्रमाण वाढले तर मेंदूतील पेशींना हा संपवतो म्हणून तणावग्रस्त राहू नका.
८ ) पुरेशी झोप न होणे –
जर तुम्ही योग्य प्रमाणात झोपत नसाल तर आणि व्यवस्थित वेळेत झोपत नसाल तर , जर तुमच्या झोपायच्या आणि उठायच्या वेळा निश्चित नसतील तर याचा निश्चितच मेंदूवर परिणाम होतो . यापासून नक्कीचे वचने गरजेचे आहे . त्यामुळे वेळेवर झोप आणि वेळेवर उठा.
९ ) धूम्रपान –
धूम्रपान आपल्या शरीराचे अनेक प्रकारे नुकसान करते . त्यात मेंदू हा महत्वाचा भाग आहे. विसराळूपणा वाढतो आणि भ्रमिष्ट होण्याची शक्यताही वाढते . हा शोध मॅकगिल यूनिवर्सिटी लावला गेला आहे .
१० ) मेंदूचा कमीत कमी उपयोग –
मेंदू शरीराचा असा भाग आहे ज्याची कार्यशैली उपयोगामुळे सुधारते . मांसपेशिचे काम करण्यासाठी जशी शरीराला व्यायामाची गरज आहे तशीच मेंदूला देखील चालना मिळण्यासाठी मानसिक व्यायामची गरज आहे . जर तुम्ही एक आरामदायी, बुद्धीला चालना न देणारे काम करत असाल तर हळूहळू तुमच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते . म्हणून मानसिक व्यायाम करा . सतत वेगवेगळे कोडे किंवा सुडोकू खेळत राहा.