Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

म्हणून चेहऱ्याला निरोगी मनाचं प्रतीक म्हणतात

आपल्या शरीराचा आणि मनाच्या विचारांचा गाभा म्हणजे चेहरा. म्हणजे बघा ना शारीरिकरीत्या दमलो असलो की चेहरा कसा दमलेला दिसतो. कशाचं दडपण असेल तर तो चेहरा देखील तणावग्रस्त दिसतो. म्हणून हा चेहरा नेहमीच हसरा असावा. हसरा चेहरा म्हणजे निरोगी शरीर आणि निरोगी मनाचं प्रतीक.

चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. इतरांविषयी प्रेम असणारा चेहरा हा अतिशय सात्विक दिसतो. त्या चेहऱ्यात व्यक्तीचे गुण डोकावतात.  नम्र चेहरा इतरांविषयी आदर दर्शवितो.

मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा. पण हे फार अवघड नाही बरं का ? माणसानं घडघड बोललं , खळखळून हसलं पाहिजे, दिलखुलास विनोद केले की चेहऱ्यावर ते भाव उमटतात.

अगदीच काय तर मनसोक्त रडलं सुद्धा पाहिजे. याचमुळे तुम्ही नैसर्गिकरित्या कोणतीही थेरपी न करता छान दिसू शकता आणि कोणते व्यक्तिमत्त्व विकासाचे क्लास न लावता देखील तुमचं व्यक्तिमत्त्व खुलू शकतं.

Exit mobile version