फाटलेली नोट चिकटवण्यासाठी… कपडे टिकविण्यासाठी… या आहेत स्मार्ट टिप्स !

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी खूप काही सांगून जातात. त्याचप्रमाणे रोजच्या जगण्यात छोट्या टिप्सची फार आवश्यकता असते. काही वेळेस अशा या टिप्समुळे आपल्या वस्तूंचे नुकसान होतं नाही. वस्तू अधिक काळ टिकतात. आज अशाच काही टिप्स पाहू यात.

1 ) लोकरीचे कपडे ठेवताना त्यामध्ये कडुलिंबाची पाने घालून ठेवावी म्हणजे कपडे खराब होत नाहीत.
2 ) पिशवी किंवा बॅगेच्या चेनला व्हॅसलिन लावून ठेवावे म्हणजे चेन गंजून नादुरुस्त होत नाही.
3 ) फाटलेली नोट चिकटवण्यासाठी त्यावर थोडासा साखरेचा घट्टसर पाक लावावा आणि नोट सुकवावी म्हणजे चांगली चिकटते.
4 ) ऑरगंडी साड्या थोड्या वाळताच लगेचच इस्त्री करावी. यामुळे इस्त्री चांगली होते तसेच फारसा त्रास होत नाही.
5 ) चप्पल, बूट पॉलिश करायचे असल्यास लिंबाची साल चोळावी आणि चांगले वाळल्यानंतर पॉलिश करावे.
यामुळे चकचकीत पॉलिश होते.
6 ) केस धुतल्यावर थोडेसे व्हिनेगर चोळल्यास ते मऊ आणि चमकदार होतात.