Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

ट्विटरवर करता येईल खरेदी

लोकप्रिय माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘शॉपिंग’ची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आहे. ट्विटर शॉपिंगच्या सेवेसाठी लवकरच ई-कॉमर्स सेवा सुरू करणार असून नवीन ई-कॉमर्स ले-आउटची टेस्टिंगही अँड्राइड स्मार्टफोनवर सुरू असल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात ‘टेक क्रंच’ने दिलेल्या वृत्तानुसार, Twitter ने आपल्या नवीन शॉपिंग फिचरची टेस्टिंगही सुरू केली आहे. सर्वप्रथम ट्विटरचे नवे फिचर कतार देशात पाहण्यात आले असून याबाबतची सर्वात आधी माहिती युकेचे सोशल मीडिया कन्सल्टंट Matt Navarra यांनी दिली. कतारमध्ये काही अँड्राइड युजर्सच्या Twitter अ‍ॅपमध्ये शॉपिंग कार्ड आणि ​शॉपिंग लिंकचा पर्याय दिसत आहे. ट्विटरच्या फीडमध्येच शॉपिंग कार्ड दिसत असून निळ्या रंगाचे मोठे शॉप बटणही आहे. Twitter च्या शॉपिंग कार्डमध्ये एखाद्या प्रोडक्टच्या किंमतीबाबत व त्याविषयी अन्य माहितीही असेल.

दरम्यान, या फिचरची सध्या अँड्राइड स्मार्टफोनवर टेस्टिंग सुरू असल्यामुळे हे फिचर पहिले अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल आणि नंतर आयफोन वापरणाऱ्यांना हे फिचर उपलब्ध होईल अशी चर्चा आहे. पण, कंपनीने अद्याप अधिकृतपणे शॉपिंग फिचरची घोषणा केलेली नाही, त्यामुळे या फिचरसाठी अजून वाट बघावी लागण्याची शक्यता आहे.

Exit mobile version