रेड मी आपले नवे मॉडेल लॉच करत असतो. आता रेडमी फोनचे 5 जी प्रकारातील मॉडेल येत असून भारतात ते 30 नोव्हेंबर रोजी दाखल होणार असल्याची घोषणा शाओमी कंपनीने सोमवारी केली होती. रेड मी 11 टी 5 जी असे या मॉडेलचे नाव आहे. रेडी मी वापरणाºया आणि नवीन स्मार्टफोन घेऊ पाहणाºया सर्वांनाच आता या नव्या मॉडेलबद्दल उत्सुकता लागलेली असणार यात शंकाच नाही. या मॉडेलबद्दलची माहितीही समोर येत आहे.
असे आहेत फिचर्स आणि वैशिष्ट्ये
हा फोन रेड मी 10 टी 5 जी या जुलै महिन्यात बाजारात दाखल झालेल्या मॉडेलची सुधारीत आवृत्ती असणार आहे. तो 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोअरेज आणि 8 जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज ने युक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय तो तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये येणार आहे. अॅक्वामरीन ब्लू, मॅट ब्लॅक आणि स्टार डस्ट व्हाईट. रेडमी ने या फोनसाठी अधिकृत वेबपेज तयार केले असून त्यावर केलेल्या दाव्यानुसार आधी असलेल्या 10 टी, 5 जी या मॉडेलपेक्षा या मॉडेलमधील कॅमेरा, स्पीड चांगल्या प्रकारचा असणार आहे.
स्पेसिफिकेशन्स
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये डयुअर रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्यापैकी एक 50 मेगा पिक्सेल आणि दुसरा 8 मेगा पिक्सेल वाईड अॅँगलचा असणार आहे. पुढच्या बाजूला सेल्फीसाठी 16 मेगा पिक्सेल कॅमेरा असेल. बॅटरी 5 हजार एमएएच ची असणार असून 33 वॅटचे फास्ट चार्जर असणार आहे. फोनची स्क्रीन 6.6 इंच फुल एचडी+ ( 1080 बाय 2400 पिक्सेल ) असू शकते, तर 90 एचजेड रिफ्रेश रेट आणि 240 एचझेड टच सॅँम्पलिंग रेट असेल. याशिवाय आॅक्टा कोअर मीडियाटेक डायमेंसिटी 810 प्रोसेसरने युक्त असा फोन असेल.
भारतात या फोनची सुरूवातीची किंमत 16 हजार 999 पासून सुरू होणार आहे. रेड मीच्या इतर फोन प्रमाणेच हा बजेटमध्ये बसणारा फोन असणार आहे.