Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

ऑनलाइन दिसू न देता असा पाठवा व्हॉट्सअॅप संदेश..

व्हॉट्सअॅपचा जगभरातील बहुतेक देशांमध्ये इन्स्टंट मेसेजिंग सेवा म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हॉट्सअॅप मेसेजिंग आल्यापासून माहिती क्षेत्रात क्रांती झाली आहे. आता देशाच्या आणि जगाच्या कोणत्याही भागात, काही क्लिकवर संदेश जातो. अॅप अधिक सुलभ, सुरक्षित आणि वापरकर्ता अनुकूल बनवण्यासाठी WhatsApp आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेशी संबंधित अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि अपडेट्स आणत आहे. व्हॉट्सअॅपच्या अशाच एका खास ट्रिकबद्दल आपण माहिती घेऊ. ज्यामुळे आपण व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन आहोत की नाही हे इतर कोणालाही कळू शकणार नाही.

१. यासाठी मोबाईल फोनचे इंटरनेट कनेक्शन बंद करावे लागेल. त्यानंतर व्हॉट्सअॅप उघडावे लागेल आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे त्याचे प्रोफाइल उघडावे लागेल.

२. आता जो संदेश पाठवायचा आहे तो टाईप करा आणि त्या व्यक्तीला पाठवा. या प्रक्रियेनंतर व्हॉट्स अॅप बंद करावे लागेल आणि इंटरनेट कनेक्शन पुन्हा चालू करावे लागेल. या ट्रिकच्या मदतीने मेसेज संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवला जाईल आणि तुम्ही ऑनलाइन आहात हे त्याला दिसणार नाही.
३. आता दुसऱ्या ट्रिकबद्दल. यामध्ये तुम्हाला मोबाईल फोनची नोटिफिकेशन विंडो वापरावी लागेल. WhatsApp वरील नोटिफिकेशन सर्व फोनवर येते. व्हॉट्सअॅप मेसेजच्या नोटिफिकेशन खाली रिप्लायचा पर्यायही उपलब्ध असतो. तो वापरून व्हॉट्सअॅप अकाउंट न उघडता संबंधित व्यक्तीला मेसेज पाठवू शकता. यामुळे व्हॉट्सअॅपवरील शेवटच्या online स्थितीत (last seen) काहीही बदल होणार नाही आणि तुम्ही ऑनलाइन न दिसता तुमचा संदेश वितरीत करू शकाल.

Exit mobile version