मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 29 सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भातील घोषणा मराठी भाषा विभागाने नुकतीच एका शासन निर्णयान्वये केली आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत
श्री. सदानंद मोरे – अध्यक्ष, डॉ. प्रज्ञा दया पवार, श्री. अरुण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, श्री. प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, श्री. प्रवीण बांदेकर, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, श्री. भारत सासणे, श्री. फ.मु.शिंदे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.रवींद्र शोभणे, श्री. योगेंद्र ठाकूर, श्री. प्रसाद कुलकर्णी, श्री. प्रकाश खांडगे, प्रा. एल.बी.पाटील, श्री. पुष्पराज गावंडे , श्री. विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, श्री. दिनेश आवटी,श्री. धनंजय गुडसुरकर, श्री. नवनाथ गोरे, श्री. रवींद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे, श्री. उत्तम कांबळे, श्री. विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202105241115474433 असा आहे.
(photo courtesy : facebook)