पुष्पा : द राइज’ या चित्रपटात रश्मिका मंदान्ना हिने ‘श्रीवल्ली’ची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. म्हणूनच हा चित्रपट पाहणारे लोक अल्लू अर्जुन तसेच रश्मिका मंदान्नाचे चाहते झाले आहेत. रश्मिका मंदान्नाकडे आजच्या घडीला अनेक प्रकल्प आहेत. पण एक वेळ अशी होती जेव्हा रश्मिकाला फिल्मी जगापासून दूर व्हायचे होते.
का सोडणार होती चित्रपटसृष्टी:
रश्मिका मंदान्नाला चित्रपटसृष्टी कायमची सोडायची होती. याचा खुलासा स्वतः रश्मिकाने तिच्या एका मुलाखतीत केला होता. यादरम्यान रश्मिकाने फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या प्लॅनिंगमागचे कारणही सांगितले. अभिनेत्री काय म्हणाली ते पाहू.
रश्मिका मंदान्नाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा विचार करत होती आणि तिने तिच्या वडिलांच्या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला होता. या मुलाखतीत रश्मिकाला विचारण्यात आले की, तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा तुमच्या वयाच्या मुली त्यांच्या आयुष्याचा आनंद घ्यायच्या पण तुम्ही रात्रंदिवस काम करायचे. तुम्हाला कसे वाटले?
या प्रश्नाला उत्तर देताना रश्मिका म्हणाली, ‘मला माझ्या आयुष्यात खूप मजा करायची होती. होय, त्या काळात मी इतके काम केले याचा मला स्वतःचा अभिमान वाटायचा. त्या कामाचे फळ आज मला मिळत आहे. पण हेही खरं आहे की तेव्हा मला वाटायचं की फक्त एकच चित्रपट करायचा. मग माझ्या आई-वडिलांनीही मला एकच चित्रपट कर आणि मग परत ये असं सांगितलं. पण नशिबात काही वेगळेच लिहिले होते. प्रेक्षकांनी मला थांबवले.