काय कांदे , बटाटे भरले का डोक्यात ? असे म्हणणारे खूप लोक आहेत. पण कधी कोणी विचार केला का की तरीही बटाटा इतका का लोकप्रिय आहे. त्याचे फायदे – तोटे आहेतच. पण आज कोणती भाजी आणली असं एखाद्या मुलाला विचारलं तर तोही पटकन बटाटयाची भाजी सांगतो किंवा आवडीची भाजी बटाटा. असा हा बटाटा सगळ्यांनाच आवडतो. बटाट्याची भाजी मग ती कोणतीही असो रस्सा अथवा चकत्या मुलं आवडीने खातात. एवढंच नाही तर मॅकडोनाल्डस मध्ये असणारी आलू टिक्की सगळ्यात स्वस्त आणि मस्त प्रकार. खिशाला परवडणारा प्रकार. मग सांगा बटाटा कुठे कमी आहे ? फ्रेंच फ्राईज या पदार्थाने तरुणाईला एक हलकाफुलका प्रकार सांगितलं. जो बाहेरही कुठेही मिळतो आणि घरी बनवायला सोपा. पण हा पदार्थ सुद्धा बटाट्याचाच !
या सगळ्यांच्या वर ताण म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आवडीचे बटाटावडे, बटाट्याची भजी इतकाच नाही हल्ली अनेक लोक हे बटाटा पोह्याचे अगदी फॅन आहेत. उपवासाला देखील हा बटाटा एक वेगळीच लज्जत आणतो. बटाट्याचे तळलेले वेफर्स उपवासाला चालतात. बटाट्याची चकली सुद्धा लोकप्रिय आहे. साबुदाण्याची खिचडीमध्ये किंवा साबुदाणा वडा यामध्ये बटाटे घातल्यास वडे मऊ आणि खुसखुशीत होतात. याच बटाट्याचा एक पदार्थ पोटॅटो क्रिस्पी. झटपट होणारा आणि खमंग.
पोटॅटो क्रिस्पीसाठी साहित्य-
किसलेला बटाटा, हिंग, जिरे, चाट मसाला, चवीपुरते मीठ , तिखट, आवडत असेल तर हळद ( नाही घातली तरीही चालेल), तळण्यासाठी तेल .
कृती – तेल गरम करून त्यात जिरे , हिंग, तिखट , मीठ , चाट मसाला घालून परतावे. नंतर किसलेला बटाटा घाला आणि कोथिंबिरीने सजवून खाण्यास द्यावे.