Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अठरा वर्षे पूर्ण केले नसले तरी तयार करता येते पॅन कार्ड

साधारणपणे 18 वर्षे वयाच्या मर्यादेनंतरच पॅन कार्ड बनवले जाते, परंतु आता ते 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच बनवता येते. 18 वर्षांच्या आधी पॅन कार्ड मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि नियम जाणून घेऊ यात.

भारतातील नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आयकर भरण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी हे आवश्यक आहे. साधारणपणे 18 वर्षे वयाच्या मर्यादेनंतरच पॅन कार्ड बनवले जाते, परंतु आता ते 18 वर्षे पूर्ण होण्याआधीच बनवता येते.

पॅन कार्ड मिळविण्यासाठी अशी आहे प्रक्रिया :
१. NSDL वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वर लॉग इन करा.
२. आता अर्जाचा प्रकार आणि श्रेणी निवडा आणि नाव, जन्मतारीख, ईमेल आणि मोबाइल नंबर यासारखे तपशील भरा.
३. अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसह पालकांच्या छायाचित्रासह अपलोड करा.
४. त्यानंतर फक्त पालकांची स्वाक्षरी अपलोड करा.
५. फॉर्म भरल्यानंतर 107 रुपये शुल्क जमा करावे लागेल.
६. यानंतर, तुम्हाला एक पावती क्रमांक दिला जाईल ज्यावरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकाल.
७. तसेच, अर्ज सबमिट केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याच्याशी संबंधित ईमेल देखील मिळेल.

आवश्यक कागदपत्रे:
१. अल्पवयीन मुलाच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा.
२. अर्जदाराचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा.
३. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र सादर केले जाऊ शकते.
४. पत्ता पडताळणीसाठी आधार कार्ड प्रत, पोस्ट ऑफिस पासबुक, मालमत्ता नोंदणी दस्तऐवज किंवा अधिवास प्रमाणपत्र सादर केले जाऊ शकते.

वयाच्या १८ वर्षापूर्वी पॅन कार्डची आवश्यकता का? :
१. जेव्हा मूल पैसे कमवते.
२. तुमच्या गुंतवणुकीत तुमच्या मुलाला नॉमिनी व्हायचे असेल तर.
३. जर मुलाच्या नावावर गुंतवणूक केली असेल तर त्याला/तिला पॅन कार्ड आवश्यक आहे.

Exit mobile version