सलग दोन वेळा ऑस्कर पुरस्कार मिळविलेल्या हॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री ओलिविया डी हॅविलँड यांचे निधन झाले आहे. पॅरिस येथील राहता घरी ओलिविया डी हॅविलँड यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या १०४ वर्षांच्या होत्या, अशी माहिती ओलिविया डी हॅविलँड यांच्या प्रवक्त्या लीजा गोल्बर्ग यांनी दिली.
सन १९३९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गॉन विद द विंड’ या चित्रपटात त्यांनी काम केले होते. या चित्रपटात त्या मेलानी हॅमिल्टनच्या भूमिकेत झळकल्या होत्या. आपल्या सहा दशकाच्या कारकिर्दीत हॅविलँड यांनी वेगवेगळ्या साकारल्या आहेत. हॅविलँड या स्टुडिओ युगातील शेवटच्या कलाकारांपैकी एक होत्या.
ओलिविया यांचा जन्म १ जुलै १९१६ रोजी टोकियोमध्ये ब्रिटिश पेंटेंट अँटर्नि येथे झाला होता. ओलिविया डी हॅविलँड यांना सलग पाच वेळा अकादमी पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते. ‘टू ईच हर ओन’ (१९४६) आणि ‘द हेरिस’ (१९४९) या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.