दूरसंचारचा नवा नियम; ग्राहकाच्या नावावर नऊपेक्षा जास्त सिम कनेक्शन नसावेत

सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकारावर आता मर्यादा येत आहे. दूरसंचार विभागाने (डॉट) बुधवारी सर्व मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्यांना आदेश दिले आहेत. वाढत्या आर्थिक गुन्हे, फसवे कॉल आणि इतर बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे.

असा असेल नियम
नव्या आदेशानुसार दूरसंचार विभागाने (डॉट) की, एका ग्राहकाच्या नावावर नऊपेक्षा जास्त सिम कनेक्शन नसावेत. जर एखाद्या ग्राहकाकडे अधिक कनेक्शन असतील, तर त्यांची पुन्हा पडताळणी करून ते बंद केले जावेत. याशिवाय विभागाने आदेशात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये एका ग्राहकाला जास्तीत जास्त सहा सिम कार्ड दिले जाऊ शकतात. वाढत्या आर्थिक गुन्हे, फसवे कॉल आणि इतर बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. न वापरलेल्या नंबरवर आउटगोइंग कॉल 30 दिवसांच्या आत, तर इनकमिंग कॉल 45 दिवसांच्या आत बंद केले जावेत.

तर होणार फोन बंद…
ग्राहकाची इच्छा असल्यास, असे मोबाइल क्रमांक बंद केले जाऊ शकतात, परंतु त्यांनी तसे न केल्यास, 60 दिवसांच्या आत क्रमांक निष्क्रिय केला जाईल. जर एखादा ग्राहक आंतरराष्ट्रीय रोमिंगवर असेल किंवा तो बंद असेल, तर त्याला अतिरिक्त 30 दिवस दिले जातील.