आता प्रीपेड ग्राहकांसाठी 30 दिवसांची वैधता असलेले रिचार्ज प्लॅन्स द्यावे लागणार आहेत. या निर्णयामुळे ग्राहकाने वर्षभरात केलेल्या रिचार्जची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
सध्या टेलिकॉम कंपन्या प्रीपेड सेगमेंटमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन ऑफर केली जाते. त्यामुळे ग्राहकांना एका वर्षात 13 रिचार्ज करावे लागतात. एका वर्षात एक रिचार्ज शिल्लक करावे लागते. ट्रायने याबाबत कंपन्यांना चपराक लावली आहे. प्रत्येक दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी किमान एक प्लॅन व्हाउचर, एक विशेष टॅरिफ व्हाउचर आणि 30 दिवसांच्या वैधतेसह कॉम्बो व्हाउचर देईल. दूरसंचार कंपन्यांना अधिसूचनेच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत या आदेशाचे पालन करावे लागेल.
मात्र, ट्रायचा हा आदेश सर्वच प्लॅनसाठी लागू नाही. एसएमएस, कॉलिंग, डाटा यांचा एकूण प्लॅन लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, स्वंतत्र प्लॅनसाठी हा नियम लागू नसेल. एक किंवा त्यापेक्षा अधिक ऑफर लागू असेल, तर हा नियम लागू असेल. परंतू इतर प्लॅन ग्राहकांना 28 दिवस, 56 दिवस आणि 84 दिवसांचे खरेदी करावे लागतील. नवीन प्लॅन तयार करण्याला आणि त्याच्या वैधतेला ट्रायने परवानगी दिली आहे.
ट्रायच्या या आदेशानंतर टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या सिस्टिममध्ये बदल करावे लागतील. हा बदल करण्यासाठी कंपन्यांना वेळ लागणार आहे. त्यामुळे कंपन्यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ट्रायने 60 दिवसांचा कालावधी दिला आहे.