Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

क्रुझ कंट्रोलसह एमजी लॉन्च करणार ‘ग्लॉस्टर’

मुंबई :  २०१९ पासून भविष्यातील आव्हानं आणि संधीना ओळखत एमजी मोटर इंडिया नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनं लॉंच करत आहे. ग्लॉस्टरच्या माध्यमातून स्मार्ट मोबॅलिटीसह (अद्ययावत तंत्रज्ञानासह) या क्षेत्रात नवीन वादळ निर्माण करायला कंपनी उत्सूक आहे. एमजी मोटार अॅडाप्टीव्ह क्रुझ कंट्रोलसह ग्लॉस्टर सादर करण्यास सज्ज झाली आहे. ही एक सक्रीय सुरक्षा यंत्रणा असून तुमच्या समोरील वाहनाच्या अंतराचा अंदाज घेऊन तुमच्या वाहनाची गती नियंत्रित करत तुम्हाला सुरक्षित ठेवते.

ग्लॉस्टर ही भारतीतील पहिली स्वयंशासित (Level I) प्रिमियम एसयूव्ही आहे. या कारमध्ये बीएमडब्ल्यू आणि व्हॉल्व्हो कारप्रमाणे स्मार्ट तंत्रज्ञान आहे. एमजी ग्लॉस्टरच्या वैशिष्ट्यांमध्ये फ्रंट कॉलिजन वॉर्निंग, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर, ऑटो पार्क असिस्ट आणि लेन डिपार्चर वॉर्निंग यांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ऑटो एक्स्पो २०२० मध्ये सर्वप्रथम कार लॉंच करण्यात आली होती.

Exit mobile version