विवाहित स्त्रिया पायात जोडवी का घालतात ?

पायात जोडवी (toe ring) घालण्यामागे काय रहस्य दडलंय ? विवाहित स्त्रिया आपल्या पायाच्या बोटात जोडवी घालतात. यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.

लग्नानंतर पायातील दुसर्‍या बोटात जोडवी घालण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे या बोटापर्यंत पोहोचणारी नस गर्भाशयाशी जोडलेली असते.

पायात चांदीची जोडवी घातल्याने स्त्रियांचे गर्भाशय सक्षम बनते.

मासिक पाळी नियमित होते. भारतीय संस्कृतीत हिंदू व मुस्लीम स्त्रिया दोन्ही पायांच्या बोटात चांदीची जोडवी घालतात.

आपल्या शरीरासाठी चांदी किती उपयुक्त आहे हे आपल्याला ठाऊक आहे. या छोट्या चांदीच्या जोडव्यांमुळे या नसेवर दाब निर्माण होऊन गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. हा दाब ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यात मदत करतो.