अभिनेता प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ या चित्रपटाची पाच भाषांमध्ये निर्मिती होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने याबाबत माहिती दिली आहे.
‘चोरीचा मामला’ चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळविली असून आता या चित्रपटाच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. पाच भाषांमध्ये निर्मिती होणारा ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट पहिला मराठी चित्रपट असणार आहे. मल्याळम, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि हिंदी या पाच भाषांमध्ये निर्मिती होणार आहे.
प्रियदर्शन जाधवने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून यात अभिनेत्री अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, कीर्ती पेंढारकर, अनिकेत विश्वासराव आणि क्षिती जोग यांनी भूमिका साकारल्या आहेत.