अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्तरावरील फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला परदेशात जावे लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान संजयने एक ट्विट करून ‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेतो आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असे आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन.’
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 11, 2020
शनिवारी संध्याकाळी त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अस्वस्थता आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. आता त्याला तिसऱ्या स्तरावरील फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. संजयची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.