‘ पावरस्टार ‘ आणि हरीश शंकर पुन्हा एकत्र

अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या  जन्मदिनाचे निमित्त साधत त्यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित  #पीएसपीके28 चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली  गब्बर सिंह या चित्रपटांनंतर पवन कल्याण आणि दिग्दर्शक हरीश शंकर पुन्हा एकदा एकत्र आले आहे. 

#पीएसपीके28 असे तात्पुरते नाव देण्यात आलेल्या चित्रपटाची निर्मिती मायथ्री मुव्ही मेकर्स करणार आहेत.

‘ पावर स्टार ‘ नावाने प्रसिद्ध असलेले पवन कल्याण अभिताभ बच्चन- तापसी पन्नू यांच्या पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपट पिंक च्या तेलुगू  भागात काम करीत आहेत.

तेलुगू  भागाची निर्मिती सुप्रसिद्ध निर्माते बोनी कपूर आणि दिल राजू  संयुक्तपणे करणार असून दिग्दर्शन वेणू श्रीराम करणार आहेत. तर दुसरीकडे दिग्दर्शक क्रिश आणि पवन कल्याण सोबत काम करणार आहेत.  2018 साली पवन कल्याण  अज्ञातवासी या त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले.