स्वराज्यजननी जिजामाता मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला

सोनी मराठी वाहिनीवरल्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेचं चित्रीकरण पुन्हा सुरू झालं आहे आता मालिकेचे नवीन भाग कधी पाहायला मिळतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे

तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की१३ जुलैपासून रात्री :३० वाजता ‘स्वराज्यजननी जिजामाता‘ या मालिकेचे नवे भाग सुरू होणार आहेत

जिजाऊंचं बालपणत्यांची जडणघडणत्यांच्या मनातलं स्वराज्याचं स्वप्नत्यांनी आणि शहाजी राजांनी मिळून घेतलेली स्वराज्यस्थापनेची शपथ आणि शिवजन्म हे सर्व आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंतइतिहासाच्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी या मालिकेतून मिळत आहे!

 प्रेक्षकांनासुद्धा आता नव्या भागाची आणि त्यांच्या आवडत्या मालिकेच्या पुढच्या गोष्टीची उत्सुकता आहे१३ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना मालिकेचे नवे भाग पाहायला मिळणार आहेत

या नव्या भागांमध्ये छोटा शिवबा सर्वांना पाहायला मिळेलआर्यन लहामगे हा बालकलाकार छोट्या शिवबाची भूमिका साकारणार आहेस्वराज्याच्या ध्येयासाठी जिजाऊंनी शिवबांना कसं तयार केलंहे नवीन भागांमध्ये दिसणार आहे.

 एका मुलखावेगळ्या आईची गाथा आणि स्वराज्य बांधणीची कथास्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून सोनी मराठी वाहिनीनं प्रेक्षकांसमोर मांडली आहेजिथून गोष्ट सुटली आहे तिथून पुढची गोष्ट नवीन भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.