चीनशी संबंधित कंपन्यांवर भारत सरकारने दुसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने आता आणखी 47 चिनी अॅप्स बॅन केले आहेत. नव्याने बॅन करण्यात आलेल्या अॅप्समध्ये बहुतांश ‘क्लोनिंग’ अॅपचा समावेश आहे. विशेष म्हणजे चीनशी सीमेवर झालेल्या तणातणीनंतर केंद्र सरकारने 59 चीन ऍप्सवर यापूर्वीच बंदी घातली आहे.
बॅन केलेले क्लोनिंग अॅप्स म्हणजे आधीपासून बॅन असलेल्या अॅपसाठी पर्याय म्हणून उतरवण्यात आले होते. नव्याने बॅन केलेल्या अॅप्सची यादी लवकरच जारी केली जाणार आहे. याशिवाय, युजरची खासगी माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका यांच्या आधारे भारत सरकारने अजून 250 अॅप्सची यादीही बनवली असल्याची माहिती सुत्रांची माहिती आहे. नव्याने बॅन करण्यात आलेल्या अॅप्सच्या यादीत यावेळेस काही आघाडीच्या गेमिंग अॅप्सचाही समावेश आहे.