व्हॉटस्‌अपवर तुम्हाला ब्लॉक केलेय? फिकर नॉट; असे करा पुन्हा अनब्लॉक

व्हॉटस्‌अप वापरताना अनेकदा आपण नको असलेल्या व्यक्तीला ब्लॉक करतो. तसेच आपल्यालाही अनेकजण ब्लॉक करत असतात. पण हे ब्लॉक करणं आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.

पण आता पुढील एका युक्तीने आपल्याला कुणी ब्लॉक केले असेल, आपला ब्लॉक काढून टाकता येतो आणि त्याला हाय-हॅलो करून पुन्हा आश्चर्याचा धक्का देता येतो.

सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर व्हॉटस्‌अपचे ॲप सुरू करा.
सेटिंगमध्ये जा.
तेथून माय अकाऊंटला जाऊन सर्वप्रथम डिलिट माय अकाऊंटवर क्लिक करा.
त्यानंतर व्हॉटस्‌अप आपल मोबाईल क्रमांक मागतो. त्यानंतर आपले व्हॉटसॲप डिलिट होते.
हे सर्व झाल्यानंतर तुम्ही मोबाईलमधून व्हॉटस्‌अप अन इन्स्टॉल करा.
त्यानंतर स्मार्टफोन रिस्टार्ट करा.
पुन्हा व्हॉटस्‌अप नव्याने अन इन्स्टॉल करा.
आता तुम्हाला ज्यांनी ब्लॉक केलेले असेल ते सर्व अनब्लॉक होतील.
पण एक काळजी जरूर घ्या. तुम्ही ज्यांना ब्लॉक केले असतील असे क्रमांकही आपल्याला दिसतील. तेव्हा त्यांना अनब्लॉक करायला विसरू नका.